________________
२३२ मोरोपंतकृत हाला संहिता ह्मणतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद ह्या चार वेदांच्या चार संहिता असून, ) प्रत्येक संहितेची वेगळी वेगळी ब्राह्मणे आहेत. ब्राह्मणांत बहुतकरून यज्ञ कसा करावा हे गद्यरूपाने सांगितलेले असते, तरी त्यांत कोठे कोठे संहितेतील मंत्र घेऊन त्याचा अर्थ केलेला असतो, किंवा मंत्राच्या संबंधाने काही इतिहास सांगितलेला असतो. तशीच त्यांत निरनिराळ्या यज्ञांची फळेही २ सांगितलेली असून कित्येक आचार वर्णिलेले असतात उपनिषदें ही ब्राह्मणांस जोडलेली परिशिष्टे होत. त्यांचा उद्देश वेदांचा गूढार्थ प्रकट करण्याचा आहे. प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा व चरण आहेत. शाखा अथवा चरण ह्मणजे संहितेच्या निरनिराळ्या पाठांचे अध्ययन करणारे निरनिराळे लोक. ऋग्वेदाच्या शाकलबाष्कलादि मुख्य पांच शाखा असून यजुर्वेदाच्या शायशी शाखा आहेत. शायशी शाखांपैकी बऱ्याच शाखांची नांवें अप्रसिद्ध आहेत. अथर्वण वेदाच्या मुख्य नऊ शाखा असून सामवेदाच्या हजार शाखा होत्या असें ह्मणतात. वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेदांत ब्राह्मण ग्रंथ आहेत. त्यांत ऋग्वेदाच्या ब्राह्मणांना 'बव्हच' ब्राह्मण, यजुर्वेदाच्या ब्राह्मणांना 'अध्वर्यु' ब्राह्मण, अथर्वणवेदाच्या ब्राह्मणांना 'अथर्वीगिरस' ब्राह्मण व सामवेदाच्या ब्राह्मणांना 'छंदोग' ब्राॐ ह्मण ह्मणतात. मुख्य वेदाशिवाय काही सूत्रग्रंथ आहेत त्यांना वेदांगे झणतात. वेदांगें सहा असून 'शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, व ज्योतिष' ही त्यांची नावे होत. वरच्याशिवाय आर५ ण्यक' ह्मणजे अरण्यांत बसून ह्मणण्यासारखे ग्रंथ यांचीही वेदांतच गणना होते. उपनिषदांना कोणी आरण्यकांचाच अंतभेद मानतात. प्रत्येक वेदाला निरनिराळी आरण्यकें आहेत. एकंदर एकशेआठ उपनिषदें उपलब्ध असल्याचे समजते. त्यांत ईशकेनकठप्रश्नमुंडमांडुक्यादि श्रीशंकराचायोनी भाष्य लिहिलेली एकादश उपनिषदें मुख्य मानतात. वेदाच्या उत्पत्तीविषयीं व्यास, जैमिनी व शंकराचार्य ह्यांची मते वेद अनादिसिद्ध आहेत अशी असून अलीकडचे शोधक वेदांच्या उत्पत्तीचा काळ ख्रिस्तीशकापूर्वी दहा हजार वर्षांच्याही पूर्वीचा असावा असे मानतात. चार वेदांत ऋग्वेद अतिशय प्राचीन आहे. त्यांतील पुष्कळ भाग इतर तीन वेदांत आले आहेत. ऋग्वेदाचे दोन तन्हांनी भाग पाडिले आहेत. त्यांत मंडल, अनुवाक व सूक्त कल्पून वेदाचे भाग पाडणे ही जुनी तन्हा होय. एकंदर ऋग्वेदाची मंडलें दहा असून प्रत्येकांत चार अथवा जास्त अनुवाक असतात. प्रत्येक अनुवाकांत तीन अथवा अधिक सूक्ते असतात. व प्रत्येक सूक्तांत एकाहून अधिक ऋचा असतात. दुसरी त-हा वरच्यापेक्षा जास्त सुसंबद्ध आहे. सर्व ऋग्वेदाची आठ अष्टकें कल्पिली असून प्रत्येक अष्टकांत आठ अध्याय मानले आहेत. प्रत्येक अध्यायांत पंचवीसाहून जास्त वर्ग असतात; व एकपासून नऊ पर्यंत ऋचांचा एक वर्ग होतो. ऋग्वेदाची सूक्ते एकहजारापेक्षा किंचित् जास्त असून प्रत्येक सूक्तांत सरासरीने दहा ऋचा धरिल्या ह्मणजे एकंदर ऋग्वेदांत दहाहजारांपेक्षा थोड्याशा अधिक ऋचा सरासरीने बसतात. "वेदसूक्ताची कविता साधी, सुंदर, सहजाति संपन्न आणि निष्कपट अर्थगौरवांनी भरलेली आहे. तीत ‘उपा' (प्रातःकाळचे अरुणवर्णाचें तेज), 'वरुण' (रात्रीरूप देवता ), 'सविता' (सूर्यरूपी देवता), इत्यादिक सृष्टपदार्थाची आणि तेजाचा अत्युत्तम वर्णने भरली आहेत.” ( वेदार्थयल. ) वेदात दव तह । भरली आहेत." ( वेदार्थयत्न. ) वेदांत देव तेहतीस आहेत असे पुष्कळ ० साल आहे. 'ये देवासो दिव्येकादश...यज्ञमिमं जुषध्वम्' (ऋग्व यकादश...यज्ञमिमं जुषध्वम्' (ऋग्वेद १-१३९-११) या