Jump to content

पान:केकावलि.djvu/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. खळासि न दिसो भलेपण, खरे भल्या दीसतां.॥ सैदाहि हित नायकों; बहु अपाय केले, करूं; तरी संकृप बाप तूं ह्मणसि, 'नायके लेंकरूं;' । कधीं न करिसी प्रभो! मजकबाळकोपेक्षण; धिशमनं कमलालयायाः । को न श्रयेत कमनं कमनन्तमिच्छन्' ॥ (विष्णुभक्तिकल्पलता ४.१८). ६. त्वां. व्या०-पंतांनी आपल्या काव्यांत पुष्कळ ठिकाणी 'त्वां' च्या जागी 'तां' शब्द घातलेला आढळतो. 'त्वां'च्या जागी 'तां' घातल्याची थोडी उदाहरणे:-(१) नासेल बीज म्हणउनि रोधावा मार्ग वारिचा बा ! तां । [आदिपर्व-अ० २ गी० १६], (२) स्त्रीकामा! गुरुघात श्रीकामापरिस तांचि हा केला । [वनपर्व-अ० ११ गी० २७], (३) परिसावे सादर मन करुनि भरतवंशभूषणा बा ! तां । [कर्णपर्व-अ० १६ गी० १२], (४) तेव्हां उत्तर कोण? कोण धरुनि क्लीबा वसावें चि तां । कृष्णविजय-अ० ७६ श्लो० १७], (५) आत्मा व्यर्थचि पीडिला मजहि तां केलें बहु घाबरें (भस्मासुरआख्यान १४). - १. चांगुलपण. विष देणान्या पूतनेला प्राणान्त दंड करून शेवटी तुम्ही तिला मुक्ति दिली याचंच नांव 'दटावुनि भातुकें देसी'. हा तुमचा तिच्यावर केवढा बरें उपकार झाला? चतुर्थचरणार्थः- दुष्ट व नास्तिक लोकांना जरी दुष्टांना शासन करून त्यांस सद्गति देण्याचे प्रभूचे चांगुलपण कबूल झाले नाही तरी साधुजनांना तुम्ही खरे कृपावंत, भले असे दिसतां. तुमच्या पायांची महासदयता जरी दुष्टांना कबूल झाली नाही तरी साधूंना ती निःसंशय तशी वाटते-हा 'भावार्थ. २. प्रास्ताविकः-कवि भगवंताच्या पूर्वोक्त सदयतेचे दृढीकरण करीत होत्साते देवास म्हणतात. अन्वयः- 'सदाहि...करूं तरी तूं सकृप बाप लेंकरूं नायके [असें] म्हणसि; प्रभो [तूं] भजकबाळकोपेक्षण (भक्तरूपी बालकाची हयगय) कधीं न करिसी; ज्यापरि पशुपपाळ (गवळ्यांचा स्वामी नंद) तूजवरि क्षण न कोपे. ३. ऐकत नाहीं. प्रथमार्धाचा अर्थः-आम्ही पापी जीव तुम्ही आमच्या कल्याणाची गोष्ट सांगत असतां तिकडे निरंतर दुर्लक्ष करितों. [ तुमचा हितकर उपदेश न ऐकतां उलट आम्हीं आत्मघाताची पुष्कळ कृत्ये केली व त्याचा पश्चात्ताप न करितां अद्यापिही कतिच आहों. इतके अपराध नित्य आमच्या हातून घडत असतां तूं कृपाळु पिता आम्हांस मोठीशी शिक्षा न करितां 'काय करावें. लेकरूं फार हट्टी असल्यामुळे कांहीं ऐकत नाही एवढेच म्हणतोस. ४. अहितकारक कर्मे, ज्यामुळे स्वतःचे नुकसान होईल अशी कृत्यें. ५. कृपायुक्त, दयाळु. ६. भजक-तुला भजणारा, जो बाळक-अज्ञजन त्याचे उपेक्षण-उपेक्षा, अज्ञान भक्तांची उपेक्षा. तृतीयचरणार्थ:-(देवा! तुमचे भक्तजन ही तुमची बाळके होत. त्यांना तुम्ही त्यांच्या कल्याणाविषयी निरंतर उपदेश करितां, पण ते त्याचा सदोदित अव्हेर करितात व मागच्याप्रमाणेच पुढेहि आत्मनाशक कामे करण्यास प्रवत्त होतात. इतके जरि ते अपराध करितात तरि ) प्राग ! तुम्ही फार दयावंत बाप असल्यामुळे