Jump to content

पान:केकावलि.djvu/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२. मोरोपंतकृत चुके न, परि सार्थक श्रम न देवैराचा करी; । वदेहि भैलतेंचि; तें तिसंचि, कोप टाका, पुंसा; ____ असें मृदु, म्हणोनि बा! मज न धोपँटा कापुसा. ॥ ८४ १. सफल. द्वितीयचरणार्थः-तो सीतेची सेवा करण्यांत कधीही चुकला नाही, पण सीतेने आपल्या दीराच्या श्रमाचें सार्थक केले नाही. कृतसेवेबद्दल मनापासून शाबासकी मिळणे हेच एकनिष्ट सेवेचें साफल्य, तें लक्ष्मणास मिळाले नाही. लक्ष्मणाने सीतेची सेवा इतक्या भक्तिभावाने केली की, नूपुराशिवाय तिचे केयूरकुंडलादि अलंकार त्याने कधीच पाहिले नाहीत. सीतेचा शोध करीत रामलक्ष्मण ऋष्यमूक पर्वतावर गेले तेव्हां तेथे त्यांना सुग्रीवाने उत्तरीयवस्त्रांत बांधलेले सीतेचे अलंकार दाखविले. रामाने ते अलंकार ओळखावयास लक्ष्मणास सांगितले. त्या वेळी तो म्हणतो;-(स वाक्यमब्रवीत् ) जाने न केयूरे न कुंडले । नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात् ॥' [संस्कृत मंत्ररामायण-पृष्ट १७२ श्लो० ५९]. 'मला केयूरकुंडले ओळखू येत नाहीत पण मी सीतेचे नित्य पादवंदन करीत असल्यामुळे तिचे पादभूषण नूपुर मात्र ओळखतों.' २. दीर जो लक्ष्मण त्याचा. व्यु:-प्राकृत 'दिअरो' पासून मराठी 'दीर' शब्द झाला. ३. बोलू नये ते, अयोग्य. सीता लक्ष्मणाला जें दुरुत्तर बोलली त्याचे वर्णन पंतांनी प्राकृत 'मंत्ररामायणां'त केले आहे. त्याचा मासला:-"हें दीराचे वाक्य श्रवण करुनियां म्हणे, 'तुझा काम । कळला मज दुर्बुद्धे ! परि मत्तनुनाथ एक रघुराम" ॥ ५१ ॥. ते ऐकून लक्ष्मणाच्या मनाची झालेली स्थिति कवि वर्णितात:-"ऐसें महोग्र वदतां, लक्ष्मण करि कर्णपाणिसंगतिला । शिव ! शिव!' म्हणोनि वंदी, दुर्वाक्यश्रवणकंपितांग तिला ॥ ५२ ॥ 'हा हा श्रीराम!' असें दुःखाकुल तो वदोनि कर जोडी; । सीतेसि ह्मणे, 'माते! पापाची तूं वृथा न कर जोडी ॥ ५३ ॥ माते ! राहें स्वस्था; जातों त्वत्पादपंकजा नत मी; । साग्रज सत्वर येतों; मन्न करावे तुवां न चित्त तमी'.” ॥ ५४ ॥ [मंत्ररामायण-अरण्यकांड]. तसेंच पंतांच्या मुक्तामालेतील ४७,४८ हे श्लोक या संबंधी वाचनीय आहेत. ४. बोलणे. ५. सीतेलाच. सीता लक्ष्मणाला जें दुरुत्तर बोलली ते तुम्ही तिलाच विचारा, मज गरीबावर त्याचा राग काढू नका. ६. विचारा, चौकशी करा. ७. व्यु:-'धोपटणे हा शब्द हिंदुस्थानी 'धोप' (दोन्ही हातांत धरलेली लांब काठी) ह्या शब्दापासून निघालेला दिसतो. मी गरीब म्हणून देवा! तुम्ही माझ्यावर रागावू नका. कापूस मऊ म्हणून त्याला धोपटणे हे जरी लोकस्वभावानुरूप आहे तरी ते अयोग्य. सीतेचा दोष मी तुम्हांला दाखविला म्हणून तुम्हांला राग आला असेल, तर तो टाका व तिलाच तिच्या आ- १ चरणाचे कारण पुसा. या केकेच्या प्रथमार्धात कवीने सप्ताक्षरी यमक साधले असून द्विती. न पचाक्षरी यमक साधिले आहे. 'कापुस मऊ सांपडला म्हणून त्याला धोपटूं नये, ही व्यवहारांतील चतुर्थ चरणांत संग्रहित केली आहे म्हणून हा अर्थांतरन्यास अलंकार झाला.