पान:केकावलि.djvu/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत ___ म्हणे क्षण पुरांतक, क्षण मुरांतक ; ब्राह्मणा करणे महत्पाप असून विष्णूची उपासना मात्र खऱ्या देवाची उपासना, अशा प्रकारची वैष्णवांची मते दुराग्रहाची होत. विष्णुशिवात्मक दोन्ही देव मुख्यच आहेत असें मी मनांत समजतों. शैववैष्णवांतील विरोधः- शैववैष्णवांचे परस्परांशी पराकाष्ठेचे हाडवैर होते व अजूनही कचित् दृष्टीस पडते. भाविक वैष्णवाच्या दृष्टीस शिवलिंग पडलें असतां, तसेंच भाविक शैवाच्या दृष्टीस विष्णुमूर्ति पडली असता त्यांना फार संताप येतो व ते दृष्टिजन्यपापनिवारणार्थ स्नान करितात. मुक्तेश्वराने सभापर्वांत या दुराग्रही वैष्णवांचें व शैवांचे थोडक्यांत दृष्टांतरूपानें सरस वर्णन केले आहे:- 'चैद्य कौरव एक पंक्ती । हस्त मेळवूनियां हस्तीं । क्षुद्रबुद्धी अवलोकिती । कृष्णद्वेषी दुरात्मे ॥ ७४ ॥ काशीविश्वेश्वराचें लिंग । सुवर्णकमळी पूजिलें सांग । जें देखतां पावती भंग । महापर्वत पापांचे ॥ ७५ ॥ ते नूतन पाखांडी वैष्णवा । देखतांची संताप उपजे जीवा । जेंवि का पूर्वजांचा ठेवा । हिरोनि नेला तस्करी ॥ ७६ ॥ नातरी विंदुमाधवप्रतिमा । शृंगारिली देखोनि, अधमा । केशकपाळी जंगमा । शिरच्छेदनासारिखे ॥ ७७ ॥' [सभापर्व-अध्याय १० ]. यासंबंधी पुढील पुराणवचन ध्यानात ठेवण्याजोगे आहे. 'पुरुषोत्तममाश्रित्य शिवनिंदारता द्विजाः । कलौ युगे भविष्यंति तेषां त्राता न माधवः' ॥ (सौरपुराण अ० ४-२१) ह्या शैववैष्णवांच्या विरोधाचे वर्णन मूळपुराणांतही आढळतें:- ‘विष्णुदर्शनमात्रेण शिवद्रोहः प्रजायते । शिवद्रोहान्न संदेहो नरकं यांति दारुणम् ॥' ( पद्मपुराण). याविषयी एकनाथस्वामी भागवतांत लिहितात. 'वैष्णवांसी शिवरात्री विरुद्ध । हे बोलणे अति अबद्ध । सकळपुराणी अविरुद्ध । व्यास विशुद्ध बोलिला ॥ १२५५ । शिव श्याम तमोगुणी । तो शुद्ध झाला विष्णूच्या ध्यानीं । विष्णु श्याम शिवचिंतनीं । विनटले गुणी येरयेरा-५६, शिव धवळधाम गोक्षीर । विष्णु घनश्याम अतिसुंदर । बाप ध्यानाचा बडिवार । येरे येर व्यापिला-५७. मुदलीं दोहोंसी ऐक्य शुद्ध । मग उपासकांसि कां विरुद्ध । हा कवीचा सिद्धांत. (ए. भा. अ० ११.) ४. देव. ही विष्णुशिवात्मक दोन्ही दैवतें मुख्यच आहेत. यांत गौणता (कमीपणा) कोणाकडेही नाही. मुक्तेश्वराप्रमाणेच शैववैष्णवांतील विरोध मोरोपंतांला मुळींच संमत नव्हता. त्यांची उपास्यदेवता जरी श्रीराम होती तरी इतर देवतांविषयी विरोध त्यांच्या ठिकाणी किमपिही वसत नव्हता. त्यांनी बहुतेक देवांविषयी स्तुतिपर स्फुट प्रकरणे रचली आहेत. त्यांत खंडोबा, म्हाळसा, रेणुका, सिद्धेश्वर, महालक्ष्मी, कालभैरव अशांचाही समावेश केलेला आढळतो. हरिहरांत भेद नाही अशा प्रकारचे उद्गार पंतांनी पुष्कळदां काढिले आहेत. पुढील उदाहरण पहाः- 'श्रीहरिहरनामें हो। सर्व तुम्ही एक, गुह्य हे संतीं । कथिलें, यास्तव भलतें माझ्या ह्या आननी नसो अंती ॥' [प्रांतप्रार्थना-गी० ९ स्फुटकाव्ये', भाग १, पृ० २७५.] १. म्हणतों. २. क्षणभर, एक वेळ. प्रास्ताविकः-हरिहरांविषयी आपली अभिनबुद्धि दाखवितांना कवि म्हणतो. ३. त्रिपुरांतक महादेव. कथासंदर्भ:- तारकासुर नामक असुरास तारकाक्ष, विद्युन्माली, व कमललोचन असे तिघे पुत्र होते. त्यांनी पार तप आचरून शिवास व ब्रह्मदेवास प्रसन्न केले व अंतरिक्षगामी तीन पुरे मिळविली. पढ़ें