________________
केकावलि. प्रसादचतुरा ! कैसा तरि करा बरा हा जन. ॥ ६३ मृत्यु, पाताल असे तीन लोक) त्याची म्हणजे जगत्रयांनी कर्तव्य जी नमस्क्रिया (नमस्कार) ती जगत्रयनमस्क्रिया, त्याला भाजन-पात्र. तीन लोकः-'यू', 'अंतरिक्ष' व 'पृथ्वी' असे तीन लोक वेदांत सांगितले आहेत. जेथें सूर्यचंद्रादि प्रकाशगोल आहेत तो 'धू' लोक सर्वांत उंच आहे. जेथें वातावरणांत मेघ असतात तो अंतरिक्ष लोक त्याच्या खाली असून सर्वांत खाली आपली पृथ्वी आहे. या तीन लोकांनाच 'स्वः' 'भुवः' व 'भूः' असें अनुक्रमाने म्हणतात. पूर्वी अंतरिक्ष हे जलमय आहे असे समजत. पाताळ लोकाचा उल्लेख वेदांत मुळीच नाही. 'भूः' 'भुवः,' व 'स्व:' याशिवाय 'यू'लोकावर 'महः', 'जनः' व 'तपः असे तीन लोक असून त्यांच्या पेक्षाही वरचा 'सत्यं' म्हणून सातवा लोक मानतात. तृतीयचरणार्थः-भगवंताच्या पायाची गोष्ट घटकाभर राहूं द्या. त्याच्या पायाच्या धूलिकणासही जगत्रयाने नमस्कार करावा अशी त्याची योग्यता आहे. धूलिकणाची जर ही योग्यता, तर पदकमलाची जास्ती व करकमलाची त्याहूनही जास्ती. म्हणून तुमच्या पायाचा एखादा धूलिकण जरी माझ्या मस्तकावर ठेवाल तरी मी कृतार्थ होईन. १. प्रसाद करण्याविषयी चतुर जे तुम्ही त्या ! अनुग्रहकुशला! खुबीदार शब्दयोजना:-येथे 'प्रसादचतुरा!' हे संवोधनपद फार खुवीदार आहे. प्रथम माझ्या मस्तकावर कर ठेवा अशी प्रार्थना केली, नंतर इतक्या मानास आपण पात्र नाही असें समजून पदाप्रति प्रणाम करतो असे म्हटले. पण हे दोन्ही उपाय देवाला आवडतव नसतील अशी आशंका धरून पंतांनी 'प्रसादचतुरा' असें पद योजिलें, चतुर्थ चरणाचाय ___ अर्थः-देवा ! तूं चतुर आहेस, तूं हवी ती तोड शोधून काढ आणि मला पावन करद जो चतुर आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी उपायांनी स्वभक्तांचे मनोरथ पूर्ण की र्षि लच-असे तात्पर्य. २. कोणत्या तरी प्रकाराने ( कसा करावा तुम्ही प्रसाद करण्याविदिया चतुर आहां, तुम्हाली'मा मदाने सुचवावें असें कांहीं नाही, म्हणून तुम्ही कोणत्या तरी प्रकाराने (तुमच्या मनास योग्य दिसेल त्या वरीलपैकी किंवा द. सरा एखादा योग्य दिसेल त्या उपायाने) माझें कल्याण करा हा कवीचा हद्धतार्थ. 'पांडुरंगस्तोत्रां' तील पुढील श्लोक या केकेसंबंधानें वाचनीय समजून येथे दिला आहे. प्रकार ध्रुवनारदर्षिशुकभीष्मव्यासदाल्भ्यादि जे । ते ज्ञानी सुकृती तयांसि दिधलें तें तों न मातें दिजे।। वेश्याजामिळपूतनाघदनुजव्याधादिका जे दिले । ते द्यावे फल त्याहती बहन दिलें। ॥ १२ ॥ ३. कृतार्थ, गतपाप. पंतांनी भगवंताच्या पदाब्जरजाचे दुसऱ्याही केकेंत वर्णन केले आहे. भगवंताच्या रजाचे माहात्म्य भागवतांत पुढील प्रकारे सुंदर वर्णिले आहे:-यत्पादपांसुर्बहुजन्मकृच्छ्रतो धृतात्मभियोगिभिरप्यगम्यः. [दशमस्कंध.] तसेंच शंकराचार्यांनी 'सौंदर्यलहरी'त भगवतीच्या चरणकमलाचे माहात्य पुढीलप्रमाणे केले आहे:-तनीयांसं पांसुं तव चरणपंकेरु. हमवं, विरिंचिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम् । वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रण शिरसा, हरः संक्षुभ्यैनं भजति भसितोडूलनविधिम् ॥ २॥ येथे 'सारालंकारमिश्रित प्रो. ढोक्ति अलंकार जाणावा.' [य० पां०-पृ० २३८.] १५ मो० के०