पान:केकावलि.djvu/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. 57 खैरी करितसे कशी तव जनीहि सत्ता हा; हिचा वध न निंद्य बा ! प्रबळ मूर्त सत्ताप हा. । 'कथासुरभिचा रस खंहित, पुष्कळ, खादुही,' १. केकान्वयः-खरी तव जनींहि कशी सत्ता करितसे पहा, बा! [देवा!] हिचा वध निंद्य न,हा प्रबल मूर्त सत्ताप होय]. 'कथासुरभिचा रस स्वहित पुष्कळ [आणि] स्वादुही [आहे] [पण मला निजधना त्यजुनि, परस्वा कां दुही!' [असें ही द्वाड गाढवी साधुजनाला] म्हणे. प्रस्तावनाः-यांत विषयवासनारूपिणी खरीच्या दुष्टत्वाचे वर्णन करून तिच्या वधाविषयी आणखी एक कारण दाखवून कवि भगवंताची प्रार्थना करतात. भगवजनाच्या ठायींही.Q अधिकार. प्रथमचरणाचा अर्थः-ही विषयवासना गाढवी इतर पापी जनांवर आपला अधिकार चालविते यांत आश्चर्य नाही, परंतु तुमच्या जनांवर म्हणजे भगवद्भक्तांवर देखील ही आपला अधिकार चालविते. अजामिळपिंगळा यांच्या सारख्या पाप्यांनाच विषयवासनेची पीडा होते असे नाही, तर नारदपराशरविश्वामित्रासारख्या तपस्विवरभगवद्भक्तांचीही तिच्यामुळे त्रेधा उडते. ज्यांच्यावर भगवंताचा थोडा बहुत प्रसाद झाला आहे अशा भगवद्भक्तांची देखील जर विषयवासनेमुळे गाळण उडते, तर जे अज्ञान किंवा जाणून बुजून पापनिमग्न झाले आहेत त्यांचा कितपत निभाव लागेल हे स्पष्टच आहे ! (४. अवलोकन करा, विचार करा. प.) गर्हणीय. हिला मारण्याबद्दल कोणी तुमची निंदा करणार नाही, तर स्तुतिच करितील. तुम्हांला प्रिय अशा तुमच्या भक्तांलाही ह्या विषयवासनेची जर गांजणूक आहे तर तिला मारून त्यांना दुःखमुक्त करणे हे तुमचे प्रशंसनीय कार्य आहे. ज्यांत तुमच्या भक्तांचे कल्याण ते प्रत्येक कृत्य तुम्हांला भूषणीयच होईल, दूषणीय कदापि होणार नाहीं.६ मूर्तिमान् , प्रत्यक्ष. ७. साधुजनाचा ताप. सत्+ताप साधु+उपद्रव ही गाढवी नव्हे तर साधुजनांना एक मोठी पीडाच आहे. ८. 'मूर्त सत्ताप हा' हे अभेदरूपक होय 'रस' हा शब्द श्लिष्ट आहे, ह्याचे दुग्ध व भक्तिरस असे दोन अर्थ येथें संभवतात. कथेचा रस म्हटला म्हणजे कथेत उत्पन्न होणारे नवविध रस. रसो गंधरसे जले । शृंगारादौ विषेपे वीर्ये तिक्तादौ द्रवरागयोः' श्रृंगारादौ विषे वीयें गुणे रागे द्रवे रसः' इत्यमरः. 'रस' शब्द शृंगारादि रसाला; विषाला; तेजाला; गोड, कडू या गुणांला; प्रीतीला व जलदुग्धादि द्रवांना लावतात. 'रसाविषयीं अल्प विवेचनःसाहित्यकौमुदींत रसाचे लक्षण असे सांगितले आहे:-'कारण्यान्यथ कार्याणि सहकारीणि यानि च । रत्यादेः स्थायिनो लोके तानि चेन्नाट्यकाव्ययोः ॥ ४ ॥ विभावा अनुभावास्तत्कथयन्ते व्यभिचारिणः । व्यक्तः स तैर्विभावाथैः स्थायीभावः स्मृतो रसः ॥ ५ ॥ (४ परिच्छेद ). सर्व काव्यांत मनोविकारांचेच वर्णन केले असते ह्मणून मनोविकार उत्पन्न होण्याचें में साहित्य तेच रसांचे असते. कारणे, कार्य व साह्यकारी ही तीन मिळून समोर उत्पन्न होण्याची सामग्री होय. हीच रसाची सामग्री होते तेव्हां प्रधान मनोविकार.