________________
केकावलि. १४३ ५ तुझ्या गुणकथा महासुरभि, त्यांत ही रासँभी शिरे विषयवासना, जसि शुका अहीरास भी, । टाक. दुष्टवासनेपासून आपणास सोडवावे म्हणून ऋग्वेदांत घोरपुन कण्वांनी मरुतांची प्रार्थना केली आहे. '(मो षु णः परापरा) हे मरुतांनो ! अतिप्रबळ आणि मारावयास कठिण अशी जी निति ती आमांस कधीही न मारून टाको; ती आमच्या दुष्टवासनेसहित नष्ट होवो.' निर्ऋति देवतेचे काम दुष्टवासना उत्पन्न करणे हे होय. म्हणून दुष्टवासनेसहित तिचा नाश होवो अशी प्रार्थना केली आहे. (१.३८.६) 'काढ गा' या ठिकाणी 'गाढ गा' असाही पाठ आढळतो आणि तो यमकास अनुकूल आहे. 'गाढ' याचा 'गाड गाडून टाक-असा अर्थ करावा. पिशाचाला मांत्रिक गाडून (पुरून) टाकतात हे सर्वश्रुत आहेच. पंतांचा पाठ कोणता असावा हे सांगणे बरेच कठीण आहे.७. अगा देवा! ८. बाधा नाहींशी झाल्यावर तुझ्या मनाप्रमाणे मी सप्रेमांतःकरणाने व एकनिष्ठपणे तुझें भजनपूजन व गुणवर्णन करीन. येथे अभेदरूपकालंकार झाला आहे. विषयवासना उपमेय आणि पिशाचिका उपमान यांचें साधर्म्य येथे और (विषयवासना व पिशाचिका ही एकच आहेत दोन नव्हेत अशा रीतीने) वर्णिलें आहे... कर, गुण वर्णन कर. काव्ययमकः-यमकांतील एकाक्षरी पदें भिन्नार्थकच असावी लागत या नियमाला अनुसरून १६ व्या केकेंत 'हो' हे एकाक्षरी पद 'होवो, अहो!' अशा दोन अर्थी योजिले आहे. तसेच यात 'गा'चा अर्थ तृतीय चरणांत 'अगा' असा होत असत . 'गायन कर' असा होतो. ही यमकातील एकाक्षरी पर्दे पंतांच्या काव्यांत अथाचीही आढळतात, उदाहरण-वनपर्व अ० ४ गी० १०४,११९,१२१२ देवा! तुझ्या गुणकथा महासुरभि; त्यांत ही विषयवासना रासभी शिरे ही रासभी जशिशुका अहीरास भी तशी इतरास न भी, सदंडही इस हाकिती तथापि बह लाथळी, मग अदंड मी हा किती?-असा अन्वय. प्रस्ताव केकेंत विषयवासनेला पिशाची म्हणून तिची निर्भर्त्सना केली. या व पुढील तीन केकांत विषयवासनेला गाढवी कल्पून तिचे दुष्टत्व वर्णिलें आहे व निमा करण्याविषयीं भगवंताची पंतांनी प्रार्थना केली आहे. (२.) दया वगैरे भगवंताचे गुण वर्णन करणान्या पौराणिक कथा (गोटी कामधेनु. अगदी पहिली कामधेनु ही समुद्रमंथनापासून झालेल्या चवदा रत्नांपैकी एक होय, ती वशिष्ठाला दिली होती. कामधेनूपासून इष्टवस्तुलाभ होतो, हे वसिष्ठाच्या दिनीच्या गोष्टीवरून सर्वश्रुतच आहे. कामधेनु ह्या सुरभि, परमेश्वराच्या गुणकथा ह्या महासरभि कारण त्यांचा अधिकार कामधेनूपेक्षा मोठा आहे. कामधेनूपासून इष्टलाभ होतो तरी भगवत्पदप्राप्ति होत नाहीं; गुणकथांमुळे ती होते. ह्मणून ही उपमा फार समर्पक आहे. ४. प्रथम चरणार्थः-भगवत्कथा कामधेनूंत विषयेच्छागाढवी शिरून त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करिते. भगवद्गुणवर्णन चालले असतां लोकांचे लक्ष्य विषयवार जाऊन भगवन्नामाकडे त्यांचे दुर्लक्ष्य होते. ५.गाढवी. 'चक्रीवंतस्तु बालेया रासभा गर्दभाः