Jump to content

पान:केकावलि.djvu/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १२१ म्हणा मज उताविळा; गुणचि घेतला; घाबरें असो मन असेंचि बा ! भेजकबर्हिमेघा! बरें. । ११. प्रास्ताविकः-'कांही काळाने तुझा उद्धार करूं, इतका अधीर का झालास?' असें कदाचित् देवा! तुम्ही म्हणाल तर त्यावर माझें काय म्हणणे आहे ते मी आतां सांगतों अशा आशयाने कवि म्हणतात. हे देवा! मज उताविळा म्हणणार तर म्हणा. [तुम्ही माझा गुणचि घेतला. बा! भजकबर्हिमेघा! मन स्विोद्धाराविषयीं] असेंचि घाबरे असो (असावें) [हें] बरें. हे सर्व क्षणिक दिसे. मन घडीचा भरंवसा कसें धरील? [माझें मन] आधिनें चाकसें बहु परिभ्रमे' असा अन्वय २. अधीर. मला तुह्मी उतावळा खुशाल म्हणा. ३. हा तुम्ही माझा गुणच सांगितला. भगवत्प्राप्तीविषयीं अधीर होणे हा तुम्ही माझा दोष काढिला असें मी मानीत नाही, रहा नहीं माझा गुणच घेतला असें मी समजतो. 'मी गुणचि घेतला' असा अन्वय करन त्याचा अर्थ स्वोद्धाराविषयीं उताविळ असणे हा गुण मी स्वीकारिला आहे असा अयास तोही सरस दिसतो. तुकारामादि संतांची अशीच वचने आहेत. (१) क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती। आठविती चित्तीं पाय देवा ! ॥ उताविळ मन पंथ अवलोकी । आठवा तें, चुकी काय झाली ॥ [तुकाराम-अभंग १८४१], (२) अल्प माझी मती। म्हणुनि येतों काकुळती ।। आतां दाखवा दाखवा । मज पाउले केशवा ! ॥ धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा ! ।। तुका म्हणण दया । मज करा अमोगिया. ॥ तुकाराम-अभंग ४१८. का . मी अंत । येई बा धांवत देवराया ॥ १ तुजविण होईल जीवासि आकांत । येई बा धांवत साया येरे येरे देवा! नामा तुज वाहत। येई बा० ॥ ३ (४) वायबलांत ईश्वरभक्त 'डेव्हिड' राजा प्रसकपेविषयी असाच उतावीळ झाला होता. पुढील प्रार्थना पाहा:-'How long wilt Thou forget me, O Lord? for ever? how long wilt thou hide thy face from me? How long shall I take counsel in my soul, having sorrow in my heart daily? consider and hear me, O Lord my God.' (Psalm XIII) Tesarfa ळेपणा हा दोष असून गुणच मानिला आहे, म्हणून हा अनुज्ञा अलंकार होय. मा केका १४-पृ० ४४, पहा.] गुणचि घेतला हा गुण मी मुद्दाम घेतला आहे. माती ळपणा हा गुण मी मुद्दाम धारण केला आहे असें कवि म्हणतो-असा अर्थ करतात. ४. उतावळे, भगवत्प्राप्तीविषयी कासावीस. ५. भजक(भक्त)+बहि (मोर)+मेघा! (जलदा!)=भजकरूपी मयूरांस आनंदविणाऱ्या मेघा! मयूरास मेघदर्शन झाले म्हणजे फार आनंद होतो त्याप्रमाणेच परमेश्वराच्या प्राप्तीविषयी भक्तजन फार उत्कंठित असतात. भक्तमयूरानंदजनक अशा मेघा! स्वोद्धाराविषयी माझें मन असेंच उताविळ असावे याचे कारण द्वितीयार्धात दिले आहे. मेघमय. पमा पंतांची फार आवडती आहे:-कवीचें नांव मोरोपंत असल्यामुळे रसिककविसंमत अशी मेघमयूराची उपमा पंतांना अत्यंत प्रिय झाली असावी. परमेश्वरास मेघ ह्मणन स्वतः मयूर झटल्याची उदाहरणे त्यांच्या काव्यांत पुष्कळ आढळतात. 'केकावली' (मयूरवाणी में तरी कवीला स्वतःच्या नांवावरूनच सुचले असावे. तसेच पंतांच्या वडिलांचे नांव गयी ११ मो० के०