Jump to content

पान:कुसुमवसंत.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विनंति.

 हल्ली वाईस प्लेग जारीने सुरू आहे व त्याचमुळे बक्षिस पुस्तक निघण्यास उशीर झाला. या पुढे प्लेगचे मान असेंच राहिल्यास मासिकपुस्तकाचे अंक महिनेवार प्रसिद्ध होण्याचें चिन्ह दिसत नाहीं. तरीपण वर्ष अखेरपर्यंत १२ अंक आश्रयदात्यांस मिळण्याची तजवीज केली जाईल. दैवीसंक- टापुढें इलाज नाहीं हे लक्ष्यांत आणून आमचे आश्रयदाते आमच्यावर बेभरवसा करणार नाहींत अशी आशा आहे.

मॅनेजर

मकरंद मा० पु० वाई.