जा आंत घालितात. हे एके सुमारे दीड दिवसांत गयेस पोहो-
चतात.परंतु त्यांत बसून जे अंग हदरतें त्याविषयीं बोल -
ण्याची सोय नाहीं. मेण्यास रुपये १० १२ पडतात, परंतु
व्यांत स्वारी एक आणि बोजा कांहीं नाहीं. मेणाही २४ तासांत
पोहोचतो.
दुसऱ्या बैली गाड्या तद्देशी तऱ्हेच्या मिळतात. त्यांस भाडे
५ ६ रुपये पडते व ४ ५ दिवशी पोहोचतात.
वर जी वृत्ती धरण्याची माहिती लिहिली आहे. ती एका
मोठया हत्तीच्या सवदागराने आम्हास सांगितली त्याप्रमाणे लिहिली
आहे.
गयेहून परत दक्षिणेत द्यावयाचे म्हटले म्हणजे पाटण्यावरून
अलाहाबादेस आगगाडीच्या मार्गे यावे आणि तेथून जबलपुरावरून
पुढे मध्ये बऱ्हाणपूर हे एक शहर पाहण्यासारखे आहे. हे पूर्वी
शिंदे सरकारच्या कबजांत होते, परंतु हल्ली येथे इंग्रजी अंमल
आहे. येथें गंधी सामान, कापड व कलाबतूचे सामान चांगले
बनतें. ही गोष्ट आपल्या तिकडे सवौस महशूर आहे. लोभ
असावा हे विनंती.
एडिटराचा मित्र एक फिरस्ता.