पान:काशीयात्रा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८

आंत आणि दुसरा बाहेर असा बांधलेला असतो; म्हणजे खंदका- च्या आंतल्या अंगास एक दार आणि बाहेरल्या अंगास एक दार अशी दोन दोन भली मोठी बांधलेली असतात. हीं दारें पर- स्पराशी समोर नसतात, परंतु त्याच्या मधील रस्त्यास नागमोडी वळ- ण असून आंतील दरवाज्यापासून बाहेरील दरवाज्यापर्यंत येण्यास कांहीं नाहीं तरी ३० फूट जमीन चालावी लागते.
 नंतर हत्ती पाण्यावर येण्याची वेळ झाली म्हणजे माहुद लोक ह्या लकड कोटाची दारें मोकळीं टाकतात आणि आंत चारा वगैरे पदार्थ ठेवून आपण आसपास टपून बसतात. नंतर गजराज उद- कपानानंतर चोहोंकडे फिरूं लागले म्हणजे सहज लकड कोटा- जवळ येतात आणि आंत चारा पाहून दार शोधूं लागतात.दार सांपडले म्हणजे मुकाट्यानें आंत शिरून भोजनास आरंभ करितात. इतके झाल्यावर माहुद लोक दोन भल्या मोठ्या हत्तिणीवर स्वार होऊन येतात. दरएक हत्तिणींवर दोन मनुष्ये व जाड्या सोलाचा एक तब्बल भारा असतो. त्या हत्ति णीसह ते खंदकाच्या आंतल्या दाराजवळ जाऊन उभे राहतात, हत्तिणी पाहिल्या म्हणजे गजराज लागलीच तिकडे जातात. दारा. च्या बाहेर हत्ती आला नाही तोच माहुद लोक त्याच्या दोन बाजूस दोन्ही हत्तिणी उभ्या करितात. आणि हत्तीला त्यांच्या कडून इत का चेपून टाकितात कीं. त्याला इकडे तिकडे फिरण्यास बिल- कूल सबढ होत नाही. असे झाल्यावर दुसरे जे दोन मनुष्य हात्तणीवरून बसलेले असतात, ते सोल मधल्या हत्तीच्या पोटा खालून इकडच्याचा पदर तिकडे असे भराभर करून त्या हत्तीच्या पोटास पाठीवरून भला जबरदस्त विंडा भरितात. ह्या बिंड्यानें हत्तीचें पोट अगर्दी आवळून टाकिल्यावर त्याला दोन्ही हत्तिणी कडून दाचीत दाबीत तसाच लकड कोटाच्या बाहेर काढून ए- खाद्या भल्या मोठ्या वृक्षाकडे नेतात. आणि मग दुसरे दोन फार हुशार मनुष्य फार जलदीने त्याच्या पायांस जबरदस्त बिंडा मेरि-