पान:काशीयात्रा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ह्या कुंडास चोहीकडून पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यांपैकीं अगदी तळच्या ज्या पायऱ्या आहेत त्या एक संधी आहेत असे. गंगापुत्र सांगतात. परंतु त्याला सांवे दिसतात ते कां म्हणून विचारिलें तर ते म्हणतात की, जरी ते सांधे वर दिसतात तरी ते आंत पावेतो नाहीत. ह्या पायऱ्या श्री विष्णनीं जे वेळी आ- पल्या चक्रानें चक्रपुष्करणी निर्माण केली त्या वेळींच त्यांनी बां- ह्या पायन्याच्या एका पटांगणावर उत्तरेच्या आंगास एक कोनाडा आहे. त्यांत श्री विष्णूची मूर्त आहे. तिचें पूजन पुष्करणीचे स्नान झाले ह्मणजे करावे लागते. ह्या कुंडांत हीं पाणी भरावे लागते ह्मणून ते कोंडलेले पाणी होऊन लो- कांच्या स्नानाने त्यास गंधी येतो.
 चक्रपुष्करणी कुंड आणि भागीरथी ह्यांच्या मध्यें जो घाट आहे त्याला माणिकर्णिका घाट असे नांव आहे. ह्या घाटावर तारकेश्वराचे आलय आहे. वाराणशी क्षेत्री प्राण्याच्या प्राणोत्क- मणाच्या वेळी हे तारकेश्वर त्याच्या कानांत तारक मंत्राचा उप- देश करतात आणि त्याची जन्म मरणापासून मुक्ती होते. येथे असे सांगतात की, जो कोणी येथें म्हणजे वाराणशी क्षेत्री मरण पावतो त्यास तारकोपदेश होतो आणि तो झाला म्हणजे त्याचा उजवा कान त्या वेळी वर असतो. तारकेश्वराचें मंदीर अगदी भागीरथीच्या काठी असल्यामुळे व वर्षांतून सुमारे चार महिने ते सगळे पाण्यात बुडत असल्यामुळे त्याचे खालचे सर्व चिरे उखळले आहेत. तारकेश्वराचे लिंग कुंडांतील देवळांत आहे आणि तें कुंड हमेश भाभीरथीच्या उदकाने भरलेले असते म्हणून त्याचें स्पष्ट दर्शन बहुषा होत नाहीं.
 मणिकर्णिका घाटाच्या वरच्या आंगी चरण पादुका आहेत. त्या विष्णूची दोन पावले संगमरवरी दगडावर कोरून कुरूंदाच्या द- गडांत बसविलेली आहेत. ह्या विष्णूच्या चरण पादुका येथे स्थापन करण्याचे कारण असे सांगतात की, पूर्वी जेव्हां श्री वि