आणि त्यांच्या हातांत रेशिमाचा काळा गंडा बांधून त्याच्या पाठीवर मोराच्या पिसांचा कारल्याच्या आकृतीसारखा केलेला एक सोटा लगावतो आणि एक पैसा घेऊन सोडून देतो. भैरवनाथाची मूर्ति चतुर्भूज आहे. येथें व येथील दुसऱ्या देवळांतून देवदर्शनास गेले म्हणजे कपाळास पुजारी लोक चिमटीने एक तांबडी भरड पूड लावितात. तिला कुंदी असे नांव आहे. ह्या देवास मादक द्रव्याची फार आवड आहे. कुत्रे हें त्या देवाचें प्रिय श्वापद आहे. एक भला मोठा दगडी कुत्रा दरवाजाच्या आंत गेले म्हणजे दृष्टीस पडतो.
सुमारे ४०, ४२ वर्षांपूर्वी कैलासवाशी बाजीराव रघुनाथ पेशवे ह्यानी भैरवनाथाचे देवालय बांधविले अशी माहिती लागते. ह्या देवळाच्या बाहेरच्या आंगास ३।४ हलवायाची दुकाने आहेत. तेथे साखरेचा वडा आणि घोडा हीं विकत मिळतात. तें घेऊन देवास अर्पण करण्याचा संप्रदाय आहे. मला कोणी सांगितले कीं, तो घोडा नव्हे तर कुत्रा असतो. आणि ह्या गोष्टीचा संभवही आहे. कारण कुत्रा हें भैरवनाथाचें वहान आहे.
भैरवाच्या देवळापासून जवळच रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु आणि केतु ह्या नवग्रहांचे आलय आहे. हे नवग्रह तीन ओळींत दर ओळीत तीन प्रमाणे स्थापिले आहेत.
येथून थोडेसे पुढे गेलें म्हणजे पूर्वी सांगितलेले दंडपाणीचे देऊळ लागते. त्यांत काळकूप म्हणून जो प्रख्यात कुवा तो आहे. ह्या कूपांत मध्यान्हीं सूर्य आला म्हणजे लोक स्नानास जातात. त्या स्नानाने आपल्या भविष्य स्थितीचे ज्ञान होते असे सांगतात. येथेंच महा काळाची मूर्ति आहे. ह्या महा काळाच्या आराधनेने प्राणी जन्ममरणापासून मुक्त होतो. येथे पांच पांडवांचे पुतळे आहेत.
मणिकर्णिका कुंडाची कथा येथे लिहितो. ह्या कुंडांतील तीर्थात स्नान केल्याने मुक्ति प्राप्त होते. ह्या कुंडाबद्दल कथा
पान:काशीयात्रा.pdf/६१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५८