Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६

 मानमंदिल अथवा मानमंदीर ही वेधशाळा घाटावर उभें राहिले म्हणजे भली उंच दिसते. ह्या मंदिराच्या थोरल्या दरवाज्यां तून आंत गेले म्हणजे एक मोठा चौक लागतो. तेथून दुसऱ्या मजल्यावर गेलें म्हणजे ग्रहादिकांचे वेध वगैरे करण्याकरितां जी कांहीं मजबूत यंत्रे बांधलेली आहेत ती दृष्टीस पडतात.
 ही वेधशाळा सन १६९३ इसवीत अंभेरीचा राजा जयसिंह ह्याने बांधविली. राजा जयसिंह हा मोठाच विद्वान महमद- शहा पादशहाच्या वेळी होऊन गेला. इतर शास्त्रापेक्षां ह्याला गाणे- ताची अशी कांहीं आवड होती आणि तो ज्योतिष शास्त्रांत इतका निपूण होता की, महमदशहा पादशहाने त्याजकडून ज्योतिष शा- स्त्राच्या गणितास बाहेरील अनुभवास जो कांहीं फरक येतो तो काढून टाकावा, या हेतूनें एक सारणी तयार करविली.आणि तिला जीज महमदशाही हें नांव दिले. ह्याच सारणीच्या अनुरोधाने हल्ली दिल्ली वगैरे प्रांती ज्योतिष शास्त्राचे सर्व गणित करितात. आपली ही सारणी चांगली व्हावी आणि ज्योतिष शास्त्र संबंधी शोधास पुष्कळ मदत मिळावी म्हणून राजा जयसिंह ह्यानें दिल्ली, वाराणशी, मथुरा, अवंतिका आणि जयपूर इतक्या ठिकाणी एकेक वेधशाळा बांधविली. त्या सर्व अद्याप काल पावेतो पाहण्या सारख्या आहेत.
 महमदशहा पादशहानें जेव्हां राजा जयसिंहास वर लिहिलेली सारणी तयार करण्याचा हुकूम केला तेव्हां त्याने प्रथमतः जी आपल्या लोकांत पितळेची केलेली ज्योतिष शास्त्र संबंधी यंत्रे प्रसिद्ध होती ती जमवून त्याने काम चालावेलें, परंतु त्या यंत्रांनी मनाजोगे काम होईना ह्मणजे तीं यंत्रें लहान असल्यामुळे व त्यांजवर अंश कला, विकला इत्यादि अति सूक्ष्म भाग बरोबर नसल्यामुळे यथा तथ्य वेच होईनासे झाले. व दुसऱ्या पुष्कळ अडचणी येऊं लाग- ल्या. तेव्हां त्याने आपल्या मतानेच “रामजंतर", "समराटजंतर" इत्यादि यंत्र निर्माण केली. समराटजंत्राची तृजा १८ हातांची