पान:काशीयात्रा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१

कोणीं श्रीमानाच्या आश्रयानें राहिलेला आढळतो. हे लोक जरी विरक्तपणाचा बाणा बाळगितात तरी मलीन वस्त्रे अगर चिंध्या परिधान करीत नाहीत. त्यांचे कपडे चांगल्या प्रका- रचे असतात. ते दाढी मिशा राखितात. आणि संभावित व खपसुरत असतात. आम्ही गरीब आहोत असे जरी ते सांगतात तरी ते कधीं भिक्षा मागत नाहींत.त्यांच्या ध माँत लग्न करूं नये असे जरी सांगितले आहे तथापि जे शीख भागीरथीच्या किनाऱ्यावरील प्रदेशांत राहिले आहेत त्यांनी हा नियम पाळल्याचे आढळत नाहीं. हे लोक नेहमी आपल्या शिष्यांस आदि ग्रंथ व दशपादशहाका ग्रंथ ह्यांतील धर्मपंथाचा उपदेश करीत असतात. हे ग्रंथ नानकशहा आणि गोविंद सिंह यांणी केलेले ग्रंथ एका ठिकाणी करून रचलेले आहेत. ह्या ग्रंथावरून जेव्हां पुराण चाललेले असते तेव्हां मधून मधून कबीर, मिराबाई, आणि सुरदास ह्यांची पदें व रेखते मोठ्या प्रेमानें श्रोते वक्त्यासह म्हणतात.पुराण समाप्तीच्या वेळीं श्रोते ग्रंथापुढे यथाशक्ती दक्षिणा ठेवतात. नंतर उदासी गुरुजी त्यांस प्रसाद व मिठाई देतात.काशी क्षेत्रीं कांहीं उदासी लोकांचे मठ आहेत. तेथे रात्री पुष्कळ वेळ पुराण चालतें. ह्या उदास्यामध्ये कित्येक वेदांत शास्त्र चांगले जाणणारे असतात. नानकशहानें केलेले ग्रंथ वेदांतास अनुसरून आहेत. धर्मचंद म्हणून नानकशहाचा नातू होता त्यानें उदासी पंथ स्थापित केला. त्याच्या वं शजांस नानक पुत्र असे म्हणतात व पंजागंत त्यास शीख लोक मोठा मान देतात.
 नानकोपदिष्ट धर्म कबिराच्या धर्म पंथापासून फार भिन्न आहे असे नाहीं व साधारणतः हिंदुधर्मापासून तर बिलकुलच सुटत नाहीं. या धमांत हिंदूची सर्व पुराणे व त्यांतील पुरुष हे खरे मानले आहेत. परंतु मुख्य कटाक्ष मनुष्याने जन्मास आल्यावर आपल्या जी-