Jump to content

पान:काव्येतिहास-संग्रह ३१ ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५ पानिपताचे युद्धाबद्दल एकहि पत्र या संग्रहांत नाहीं. नानाफडणीसाचें आत्मचरित्र ( ले. १९२ ) यांत थोडासा मजकूर आहे, व लढाईनंतरच्या पळापळीची व मोठमोठ्या पुरुषांच्या व स्त्रियांच्या आपत्तीची हृदयद्रावक हकीगत त्यांत दिली आहे. सदाशिवराव भाऊचा शोध लढाईनंतर सर्वत्र झाला. त्यांपैकी नानासाहेबाने नाना पुरंदरे यांस लिहि- लेलें एक पत्र ( ले. १८७ ) आहे व त्यांत भाऊसाहेबाची खबर आणण्यास सांगितलें आहे. पानिपतचे लढाईनंतर उत्तर हिंदुस्थानांतील मराठ्यांची सत्ता कमी होऊन सर्वांनीच उठाव केला. त्यांतच बुंदेल्यांनी सर्व बुंदेलखंडांतून मराठ्यांचा अमल उठविला. तेव्हां पेशव्यांनी नागपुरकर जानोजी भोंसल्यास पाठवून आपले सरदारांची बाजू सांभाळली व आपला अमल कायम केला ( ले. १८८ ). तसेंच जाटांनीहि उचल केली. त्यावर गोपाळराव गणेश वगैरे सरदार खाना केले; व मागाहून खुद्द राघोबादादा हिंदुस्थानांत गेला व कांहीं स्वस्थता झाली ( ले. १९३, ९४ ). मल्हारराव होळकर दक्षिणेत आल्यामुळे उत्तरेकडील बाजू लंगडी पडली, ती सावरण्याचा प्रयत्न नारोशंकर करीत होता (ले. १९६ ). ले. २५३ ते ३९३ हे इंग्रजांविरुद्ध नाना फडणीसाने चालविलेल्या युद्धासंबंधींचे इ. स. १७८०-८२ दरम्यानचे आहेत. सवाई माधवरावांचे कारकीर्दीत सुद्धां राघोबादादाचा पक्ष धरून इंग्रजांचें कारस्थान चालूच होते. पूर्वी वडगांवच्या तहानें इ. स. १७७९ मध्ये इंग्रज नरम पडून त्यांनीं राघोबादादास मराठ्यांच्या ताब्यांत देऊन साष्टीसह सर्व प्रांत परत दिला होता, परंतु तो तह इंग्रजांनी पाळला नाहीं. नानांनी यावर इंग्रजांची पुरीच खोड मोडण्याचा निश्चय करून इंग्रजांविरुद्ध जंगीं संघ तयार केला. शिंदे, होळकर, भोंसले वगैरे मराठे सरदार, निजाम व हैदर यांची एकजूट करून चोहोकडून इंग्रजांशी एकदम युद्ध सुरू केलें. त्याची हकीकत या पत्रांत पहावयास सांपडेल. नाना फडणीसाची करामत या युद्धांत चांगली निदर्शनास आली. ले. ३९७ हा सवाई माधवरावाचे लग्नाच्या व्यवस्थेसंबंधी आहे व फार मनोरंजक आहे. यांत लग्नांतील निरानराळीं कामें व त्यांचा बंदोबस्त फार बारकाईनें नेमून दिला आहे. राजकारणाच्या दृष्टीने हे टिपण महत्त्वाचें नाहीं, परंतु उच्च वर्गाच्या मराठ्यांच्या लग्नाच्या रीतीभाती व ऐश्वर्य यांचें हें स्मारक आहे. ले. ३९८ पासून ४५० चे कागद नाना फडणिसाच्याच कारभाराचे सवाई माधव- रावाच्या काळाचे असून तदुत्तर वयाच्या लढाईचा पोवाडा व तपशीलवार दिनचर्या आहे. त्यापुढचे कागद दुसऱ्या बाजीरावाच्या राजवटीचें नानाविध बाबतींचे व ऐतिहासिक मह- त्त्वाचे आहेत. विशेषतः ले. ४७५ चे कागदांत एकंदर मराठी राज्याची उपज व सरंजामी सरदारांचीं पथकें व त्यांचे खर्च दाखविले आहेत. ते सर्व तपशीलवार व अभ्यसनीय आहेत. ले. ४८९-९० यांतील शकावली अत्यंत बहुमोल समजली जाते. ले. ४९१--९७ पादेतों निरनिराळ्या पेशव्यांच्या हकीकती व वंशावळी आहेत, त्याही बहुधा ज्या त्या- वेळींच अस्सल टिपणांच्या आधारे बनविलेल्या दिसतात. अशा रीतीनें या पुस्तकांत आलेले