पान:काव्यदोष विवेचन.pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०७ [१२७] ॥श्री ॥ ४ मार्च १७५९. सेवेसी विज्ञापना. येथील वर्तमान त॥ छ ४ रजबपर्यंत यथास्थित असे. विशेष. स्वामींनी भवानी आवरी व गुणाजी भोता खिजमतगार याजबरोबर शिक्केकटार राजश्री नाना पुरंधरे याचे घरीं सासवडीं होती ती देऊन पाठविली ते पावली. आज्ञा की तुही तेथे राहाल तोपर्यंत तुह्माजवळ शिक्केकटार ठेवणे. तुझी येऊ लागाल तेव्हां शिक्केकटार सासवडास नाना पुरंधरे याजकडे पावती करणे. ह्मणून आज्ञा. त्याच होईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. [ १२८ ] ॥श्री॥ २ एप्रिल १७५९. तीर्थरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलाचे सेवेसी: अपत्ये बाबूरावं दोनी कर जोडून शिर साष्टांग नमस्कार विनंति ता।। चैत्र शुद्ध ५ पंचमी प॥ सुखें असो. विशेष. वडिली गंगाजळाच्या कावडी सुमार २० वीस पाठविल्या त्या प्र॥ येथे पावल्या. आज्ञेप्रमाणे जेथे द्यावयाची त्याप्रमाणे दिली: ७ श्रीमंत नाना स्वामीकडे १ बावधनीं तीर्थरूप मातुश्रीस प॥ २ श्रीमंत भाऊ स्वामीकडे ५ रा. महादोबाबा २ श्रीमंत दादा स्वामीकडे १ बाबूराव फडणीस १ श्रीमंत सौ॥ पार्वतीबाईकडे १ सखारामपंत बापू REEREST + पुरंधरे पेशव्यांचे मुतालीक. तेव्हां पेशव्यांची शिक्केकटार पुरंधांजवळ असे हे रास्तच आहे. हे पत्र साताऱ्याहून लिहिलेले आहे. १८० गोविंदपंत बुंदेल्याचे कनिष्ठ बंधू; गोविंदपंतांचे पुणे येथे पेशव्याचे दरबारी वकील.