पान:कार्यशैली.pdf/१०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. आपल्याला हवं ते


 काल तीन बड्या राजकीय नेत्यांना टीव्हीवर जबरदस्त भांडताना पाहिलं, काय विषय होता माझ्या लक्षात नाही पण मनात राहिले आहेत त्या तिघांचे अस्ताव्यस्त, अक्राळविक्राळ, हिंसक चेहरे. लाऊड, बटबटीत आणि तोल सुटलेलं ते त्यांचं बडबडणं, काय आक्रस्तळेपणा!
 खरं म्हणजे ते तिघंही नेते फार मोठे नावाजलेले, प्रचंड जनसमुदाय पाठीशी असलेले यशस्वी आणि गाजलेले राज्यकर्ते, पण तसं असलं तरी त्यांना इतकं भावनाविवश होण्याचं, आरडाओरड करून बोलण्याचं काय कारण? असं करावं अशी गरज त्यांना का वाटते?
 मला वाटतं तशी लोकेच्छा आहे असं त्यांना वाटत असावं आणि म्हणून ते तसे वागत असावेत. आपल्याकडे काही समज आहेत की जे तपासायला हवेत. जे कर्कश्श, ते खरं, वसवसून, शिव्या देत आचरटासारखं बोलून मनोरंजन करणारा वक्ता तो चांगला वक्ता. जे शांतपणे, सावकाश बोलतात त्यांच्याकडे मुद्दे नसतात आणि ते कुचकामी आहेत इत्यादी.

 मला वाटतं हे तिघंही नेते आपल्याला जे आवडतं तसं करत होते. बटबटीत, कानठळ्या बसवणारं अन् मनोरंजन करणारं.

९। कार्यशैली