पान:कायदेभंगाच्या चळवळीत - विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टेकडीवरील विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पर्णकुटीजवळच्या धर्मशाळेत पथकाची उतरण्याची सोय केली होती. तेथे सहभोजन झाले त्या वेळी गावातील शिष्टमंडळी हजर होती. सायंकाळी जगलीमहाराजांचे देवळात पथक थोडा वेळ राहिले. तेथून शिवाजीमहाराजांच्या पुतळयास हार घालून बुधवार चौकातून मोठी मिरवणूक निघाली. सदाशिव पेठेतील शिवाजीमंदिरात जाहीर सभा झाली. त्या वेळी आठवड्याचा अहवाल मी सांगितला आणि खेडयातील समाज स्वातंत्र्याला किती आतुर झाला आहे हयाची हकीगत मी कळवली दुसरा दौरा पुढच्या सोमवारी सत्याग्रहपथक खेड तालुक्यास निघाले. त्या वेळी एक मोटार-लॉरी भाडयाने करावी लागली. स्वयंसेवक वीस जमले. जास्त येण्यास आतुर होते. मंचर, घोडे, जुन्नर, नारायणगाव वगैरे खेड्यातून दौ-यांचे मोठया थाटाने स्वागत झाले. हया दौ-यात प्रथम मीठ विकण्याचा कायदेभंग सुरू झाला दांडी येथून मिठाची मडकी आणण्यात आली होती. केव्हा केव्हा मिठाचा लिलाव होऊन बरेच पैसे जमत. स्वयंसेवकांचे कॅप्टन कृष्णराव महादेव काळे हे होते हयांनी अवर्णनीय उत्साह दाखविला. माझ्यानंतर हया उत्साही युवकास ७ म. स मजुरीची शिक्षा झाली. गाडगीळ व लिमये ही दोन मुले पोवाडयांची बहार करीत असत. मोठ्या गावातील सभेत आसपासच्या सर्व खेड्यातील बायकामुले येऊन वाट पाहात बसत असत हे दिवस उन्हाळयाचे असल्याने शेतक-यांना सुटी असे. त्या वेळी वर्षाचे हंगाम, उरुस, कुस्त्या हयांच्या निमित्ताने मोठमोठया जत्रा भरत. हयाचा फायदाही दौ-यास मोठा झाला. सभेतील व्याख्यान संपल्यावर विदेशी कापडाची होळी होत असे. त्या वेळी कोणावरही जुलूम होत नसे. उत्साहाच्या भरात लहान लहान मुले आपल्या डोक्यावरील मौल्यवान विदेशी टोप्या होळीत टाकीत. त्यात काही सरकारी अधिका-यांची मुले आपल्या वडिलांच्यादेखत आपल्या फेकीत. सभा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यावर पथकाच्या गावातून फेच्या होत त्यामुळे पथकाची गाणी गावोगाव म्हणण्याचा प्रघात पडला. उरुस व जत्रतला जमाव सोडन दिला तरी इतर सभेच्या वेळीसुद्धा काही ठिकाणी ५/७ हजाराचा जमाव सहज जमे. लोकांना या दौयाचे वेडच लागून गेले होते हा दौरा म्हणजे धार्मिक वारक-यांची एक दिडीच झाली होती. स्वयंसेवक पथकाची शिस्त धर्म म्हणून पाळीत असत. भल्या पहाटे उठून ५॥ वाजत उपासनेस सर्वजण नियमाने बसत. उपासनेच्या वेळी मी त्यांना पथकानी शिस्त आम्ही चालविलेल्या कार्याचे पावित्र्य आणि जबादारी, अत्याचार आणि सहनशीलता वगैरे धार्मिक विषयांचे समजावून महत्त्व सांगत असे. ६ वाजता

१५०|महापर्व