या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संध्या
कशास संध्ये मिरविसी तोरा
'सौंदर्याची मी सम्राज्ञी !!'
कशास संध्ये धुंद होऊनी
गासी गीते तव सुषमेची...
कशास मिरविसी डौल उगा हा
उमलविते मी कळ्या पाकळ्या
कशास संध्ये डौल मिरविसी
'प्रीतीची मी मादक राणी'
नकोस संध्ये मिरवूस नोरा
उदरी तव ग काळ निशाणी
भयाण कातर काळरात्रीची
असंख्य पापांची तू जननी...
●
कविता गजाआडच्या / ९०