या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चैतन्याचे सैंधवी झाड
फक्त
माझ्याच
गर्भाशयातून उगवलेले
ते सैंधवी चैतन्याचे
उत्फुल्ल हिरवे झाड
कधी पासून
मातीत माथा खुपसून बसलेय ?
काही अंदाज ?
बहुदा
ईव्हने जीवन-वृक्षाचे पहिले फळ चाखले
किंवा
कुंतीने नाळ कापलेले बाळ
मुका घेऊन
टोपलीतून गंगेल सोडले
किंवा
एकवस्त्रा दौपदीने भर सभेत भीष्माला
सवाल सोडले
तेव्हा पासून ??
अर्थात हे सारे अंदाजच.
...
'बीज-पेरक' सूर्यपुत्रांच्या साम्राज्यात
हे अंदाज बांधण्याची मुभा
आज
एकवीसाव्या शतकात प्रवेशताना मिळतेय,
हेही नसे थोडके !!
अगदी आत्ताच्या वर्तमानपत्रात
कविता गजाआडच्या / ७६