Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळ्या मातीच्या देहाचा
झुरे काठोकाठ प्राण
सीताईच्या शपथांनी
आजवेरी उरे त्राण...

याच त्राणावर भोळ्या
उभी युगे अठ्ठावीस
अंधाराला देत मिठी
आटवीत श्वास. श्वास..

पापणीच्या फटीतून
काल उजेडाची चिरी
दीठ लावूनिया गेली
कोण माळीण बोहरी?

पाठ देऊन वाऱ्याले
सांज उभी भुईवर
उगवाईच्या दिशेने

कधी उघडेल दार?

कविता गजाआडच्या /२०