संपादून विवेकानंद इंग्लंडमध्ये गेले होते. त्यांच्या व्याख्यानांस हजारों स्त्रीपुरुष जमत. निरनिराळ्या वेळीं प्रश्नोत्तररूप चर्चाहि होई. मार्गरेटेवर विवेकानंदांची छाप पडली. त्यांचे विचार ऐकून त्यांच्या जीवनांत क्रान्ति झाली. मार्गरेट अविवाहित होती. अनेक शास्त्रांचा तिनें अभ्यास केला होता. गणितशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, चित्रकला, अशा विविध विषयांचें सखोल अध्ययन तिनें केलें होतें.
एके दिवशीं विवेकानंदांस तिनें विचारलें, "मी हिंदुस्थानसाठीं काय करूं?" विवेकानंद म्हणाले, "हिंदुस्थानांत येऊन सेवा करा. हिंदी स्त्रियांना शिक्षण द्या. हिंदुस्थानांत भयंकर अज्ञान आहे. सर्वत्र ज्ञान नेण्याची जरूरी आहे. भारतांत या. खरेंच या."
मार्गरेटनें निश्चय केला. स्वजन व स्वदेश सोडून ती भारतास येण्यासाठीं निघाली! ज्या हिंदुस्थानला ब्रिटननें लुटलें, त्या हिंदुस्थानची सेवा करावयास ही निघाली. ती हिंदुस्थानांत आली. विवेकानंदांबरोबर हिंदुस्थानभर हिंडली. विवेकानंदांपासून ज्ञान घेत होती, अमृत पीत होती. श्रीरामकृष्ण परमहंसांच्या पुण्यकथा ऐकत होती. जीवनांत नव-विद्युत् संचरत होती.
त्या वेळेस हिमालयांतील प्रवास चालला होता. मार्गरेट अस्वस्थ झाली होती. पुन्हां इंग्लंडमध्ये परत जावें असें तिच्या मनांत आलें. चलबिचल सुरू झाली. अनेक प्रकारच्या वैचारिक शंकाहि मनांत उद्भवत होत्या. मार्गरेट सचिंत होऊन बसली होती. तिकडून विवेकानंद आले. ज्ञानवैराग्याची ती पावनगंगा आली. त्यांनी मार्गरेटकडे पाहिलें. ते म्हणाले, "चिंता करूं नको." असें म्हणून त्यांनी तिच्या मस्तकावर हात
पान:कला आणि इतर निबंध.pdf/५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२