शिवाची कल्पना आणून देणारे भिकारी; श्रम करणाऱ्यांची चित्रे तर साऱ्याच देशांत तीं चांगली असतात; कारण श्रम हा मुळांतच रमणीय आहे; तो पाश्चिमात्य असो वा पौर्वात्य असो- परंतु भारतांतील श्रमजीवांचीं चित्रे रमणीयतर दिसतील; कारण येथील श्रमांमध्येही अपूर्व सौम्यता व स्निग्धता आहे, सुसंस्कृतपणा आहे; त्याचप्रमाणे मंदिरांतील पुजारी- किंवा भटजी; नाव वल्हवून नेणारा नावाडी; मुलाला कडेवर घेणारी आई, लग्नाला निघालेली- पाटावर बसावयास जाणारी नोवरी! भारतीय विद्यार्थ्यांनो, या व अशाच प्रकारच्या शेंकडो विषयांत, शेकडो प्रसंगांत रेखांकित करण्यासारखें चित्रांत चितारून ठेवण्यासारखें तुम्हांला काहीच दिसत नाही का? तुम्हांला हे प्रसंग आपल्या कुंचल्याने वठवावे असें नाही वाटत? अशी नाही का तुमच्या मनाची तळमळ व उत्सुकता? डोळ्यासमोर अनंत रम्य सृष्टि उत्पन्न करीत- विशाल कार्यक्षेत्र बघत- जीवनांतून तुम्ही जाऊं शकत नाही काय? नाही का अशी कधीकधी दिव्य दृष्टि तुम्हांला लाभत? या अफाट देशांत अनंत प्रकार पडले आहेत. कलावानाला येथे केवढी सृष्टि आहे! इतर देशांत अशी विविधता अशी विपुलता, अशी सरसता व रमणीयता, दिव्यता व सुकुमारता नाही. ख्रिस्ताचा जन्म किंवा कृष्णजन्माचा नंदोत्सव यांचे प्रसंग प्रत्येक घरोघर आजही भारतांत नाहीत का? ते प्रसंग पहा व त्यांतून साहित्य घेऊन ख्रिस्तजन्म रंगवा, कृष्णजन्म रंगवा. सांयकाळ झाली की, तुळशीच्या अंगणांत तुळशीजवळ केलेल्या कोनाड्यांत पणती लावायला गृहलक्ष्मी जाते, त्यांत नाही का तुम्हांला सौंदर्य दिसलें? सायंकाळ होत आहे, प्रकाश अंधुक होत आहे, काळोख येत आहे- अशा वेळीं शांति-
पान:कला आणि इतर निबंध.pdf/४८
Appearance