पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ ऋणनिर्देश || 'कर्ण आणि मराठी प्रतिभा' या ग्रंथाचे हस्तलिखित वस्तुत: १९७९ सालीच मुद्रणसिध्द होऊन प्रकाशाची वाट शोधीत होते. पण योग्य वेळीच योग जुळून येतो. 'महाभारतातील स्त्रियांचे मनोधैर्य' हा ग्रंथ सविता प्रकाशनाने प्रसिध्द केल्याचे समजले तेव्हाच सविता प्रकाशनास पत्र लिहून हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध करावा असा मनोदय व्यक्त केला. त्यांनी हस्तलिखित लगेच स्वीकारले. ग्रंथाचे आणि आपल्या परिश्रमाचे आता सार्थक होणार या जाणिवेने ग्रंथ त्यांच्या हाती सोपवला. त्याचे सुफलित म्हणूनच आज सर्वांग सुंदर दृश्य रूपात हा ग्रंथ रसिकांसमोर आला आहे. त्यांचे ऋण शब्दातीत आहे. त्याची उतराई होणे शक्य नाही. गुरुवर्य डॉ. ह. कि. तोडमल यांचे मार्गदर्शन हा ग्रंथ सिध्द होताना सतत नेमाने घेतले आहे. अनेक बैठकांतून त्यांच्याशी भरपूर चर्चा केली. पुनर्लेखन केले, त्यामुळे या ग्रंथात संशोधनात्मक समीक्षेचा प्रत्यय रसिकांना, अभ्यासकांना येईल. तसेच अनेक महाराष्ट्रातील महाभारताच्या अनेक व्यासंगी विद्वानांच्या समक्ष भेटीगाठीतून, चर्चेतून वेळोवेळी झालेल्या मार्गदर्शनातून हा विषय उलगडत गेला, स्थलाअभावी त्यांचा निर्देश करता येत नसला तरी या सर्वांचा मी अंत:करणपूर्वक आभारी आहे. या ग्रंथाची अक्षरजुळणी सौ. शिल्पा काळे (एस्कॉम सर्व्हिसेस) यांनी केली. तसेच भावपूर्ण व लक्षवेधी मुखपृष्ठ श्री. शीतल शहाणे यांनी तयार केले. या सर्वांचा मी ऋणी आहे. शेवटी स्वागतशील महाभारतप्रेमी रसिकांचे आणि चोखंदळ वाचकांचे मनापासून आभार मानतो. प्राचार्य निवास, चौथा मजला, आर. एम. भट्ट इमारत २१, गोखले सोसायटी पथ, भास्कर गिरधारी १५ ऑगस्ट, १९९२ परळ, मुंबई - ४०००१२