पान:करुणादेवी.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला कसा नाही ते त्याने वर्णिले. आदित्यनारायण व शिरीष ह्यांनी आपली कौटुंबिक दुःखे मनातच ठेवून, कौटुंबिक अडचणी दूर ठेवून प्रजेच्या कल्याणार्थ कसे तनमनधन दिले, सारे सारे त्याने वर्णन . केले. ' प्रत्येक जण जर नियुक्त कर्तव्य नीट पार पाडील, तर जशी भूमाता करुणेला प्रसन्न झाली, तशी तुम्हाआम्हासही ती होईल, ’ असे तो म्हणाला.

 राजा यशोधराचे भाषण झाले. आणि करुणा काय बोलणार ! तो नुसती उभी राहिली. तिने वाकून सर्वांना प्रणाम केला. सर्वांनी तिला केला.

 समारंभ संपला. हेमा व करुणा ह्यांसहवर्तमान रथात बसून शिरीष घरी आला.


७२ * करुणा देवी