Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कडेलोट

तृषित लोचनांना मृगजळ
तशी तू उभी

मनाचे अरबी घोडे
चौखूर उधळतात
आयाळ विखरून

शक्य आहे, शेवटपर्यंत
ते असेच पळत राहतील
ऊर फाटेपर्यंत

बुजत चाललेले दिशांचे संकेत,
क्षितिजरेषा अंधार चुंबताना
मनाचे उमदे घोडे
सुसाट... दिशाहीन...

आंधळा वेग नसानसात
ऊतू जाताना
टापा वाटांचे भान विसरल्या
तुझ्या मधुर पाण्याचा झरा
मिळतच नाहीये धपापलेल्या
मनाच्या अबलख घोड्यांना

७४ / कबुतरखाना