Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्या ह्याच कुजलेल्या शहाऱ्यांचं
भयगंडाला खतपाणी होऊ नये म्हणून
ह्या धाबडधिंग्यात
उरातला अभंग
जपावा लागेल...

रखरखत्या उन्हात
आंब्याच्या दाट सावलीत
कोकिळेच्या कंठात
मेघमल्हार फुलावा म्हणून
उरातला अभंग
जपला पाहिजे.

कबुतरखाना / ७१