Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोसळू नये आपलं सत्वहीनपण म्हणून
तर्कविसंगत निढळाचा घाम पुसत
हरवलेल्या चेहऱ्यावर उसनं अवसान आणत
पुन्हा उभा राहतो आधार घेऊन बाजाराचा...


बाजार घामेजून जातो पुन्हा एकदा फसव्या व्यवहारांनी...!

१२ / कबुतरखाना