Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्या प्रदेशात...

ज्या प्रदेशात
कायदे
पुस्तकात बंदिस्त आहेत
लोककल्याण
फक्त शासकांच्या छापील जाहिरात मसुद्यात... आणि
विचारस्वातंत्र्य
कुणीतरी पाळलंय जबरदस्तीनं

ज्या प्रदेशाचा
वर्तमान
उद्याची रद्दी म्हणून पाहण्यातच धन्यता असते... आणि
इतिहास
पिढ्यापिढ्यांच्या खाडाखोडींनी भरलेला

त्या प्रदेशातील
कातळांच्या फटीतून
आजही उगवतात इवल्या फुलवेली
उद्याच्या आशांची हसरी फुले घेऊन

२/ कबुतरखाना