पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] असो; आतां मी माझ्या ग्रंथाचे वाचक व श्रोते यांची थोडी विनंति करितों. माझ्या ग्रंथाकडे प्रेमदृष्टीने पाहणारे वाचक व श्रोते हे श्रीहरीचे भक्त असणार हे उघडच आहे. वाचकहो, आपण ज्ञानवंत व मुशील असून आपल्या हृदयांत समता आहे हे मी जाणून आहे; कारण श्रीहरीचे दास आपल्या हृदयांत कधीहि किल्मीप बाळगित नाहीत. त्यांची हृदयें आरशा प्रमाणे स्वच्छ असतात. आपणहि अशाच निर्मळ अंतःकरणानें या माझ्या ग्रंधाचें परिशीलन कराल असा मला भरंवसा आहे. निर्मळ पाणी जसे कोणत्याहि रंगाचें होतें, त्या प्रमाणे आपणहि आपलें निर्मळ अंतःकरण भक्तिरसानें रंगवून या माझ्या ग्रंथाकडे पहावें अशी माझी तुहाला विनंति आहे. आतां सर्व वाचक एकाच प्रकृतीचे असणें हें कधींही शक्य नाहीं. अनेकांच्या अनेक प्रकृति असणारच, त्यांत कित्येक हरिकथेची टवाळी करणारे असतील. त्यांच्या दृष्टीनें या ग्रंथांत त्यांना अनेक दोष दिसतील व त्यांच्या आदारास हा ग्रंथ पात्र व्हावयाचा नाहीं; परंतु अशा सत्पुरुषांनां मला एवढेच सुचवावयाचें आहे कीं, ही वृत्ति लहान कीटकांतील क्षुद्र कीटकांप्रमाणे आहे. फुलपांखरें फुलांवर बसून त्यांतील गोड मध खातात व सुवासानें मत्त होऊन गुंजारव करितात, आणि कित्येक कीटक इतर प्राण्यांनां दंश करितात व घाणीवर बसून मौज मारितात, तर या पैकी तुझांला जी वृत्ति पसंत असेल त्या वृत्तीचा अवलंब तुझीं करून या ग्रंथाचें मनन करावें. यावरून माझ्या दोषाकडे लक्ष देणाराचा मी द्वेश करितों असें कोणीही समजूं नये. उलट मी अशा वाच कांचा अत्यंत ऋणि आहे. कारण कृष्णवर्णाची मृत्तिका भांड्यावर कितीही घासली तरी भांडे न मळतां अधिक स्वच्छ मात्र होतें, त्याप्रमाणे हा ग्रंथही निर्दोष होऊन अधिक उज्वल होईल. ह्मणून ग्रंथाकडे दोष दृष्टीने पहाणारां- चाही मी उपकारी असून त्यांनांही प्रेमानें वंदन करितों. अध्याय १ ला. भगवंताच्या लीला श्रवणाची उत्सुकता साधारणतः सर्वांनां सारखी आहे, · ही उत्सुकता पूर्ण करून घेण्याची साधनें संस्कृत भाषेत आहेत; परंतु संस्कृतभाषा फार थोडे लोक जाणत असल्यामुळे बहुजनसमाज संस्कृत कथाभांडारास वंचित झाला आहे. ही अडचण दूर करावी ह्मणून मी ( कृष्णकवि ) हा ग्रंथ लिहित आहे. याग्रंथांत मी वेद, श्रुति, स्मृति, व उपनिषदें यांतील सार प्राकृत जनां- साठीं प्राकृतांत वर्णन करीत आहे. प्रति ईश्वर, असे जे व्यास, व्याल्मिक व शुक; यांनीं महाराभारत, रामायण, श्रीमद्भागवत व अठरा पुराणें असे वेदतुल्य ग्रंथ संस्कृतांत करून ठेविले आहेत. त्या ग्रंथांतील सर्व कथा मी प्राकृतांत वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राकृत हरिभक्तांची स्थिति, तहानेनें व्याकूळ असलेल्या गृहस्थास पाण्याची खोल विहिर दिसावी, पण पाणी वर काढण्यास जवळ पात्र व दोर असूनये त्याप्रमाणें झाली आहे. अशा प्राकृतजनांसाठी मी पात्र