पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

gጃ खडू उघाळलेलें पाणी किंवा तांदुळाचें धूण असतें असा पुष्कळांचा अनुभव आहे. सहकारी कोठ्यांत एकत्र गाँवलेल्या चारचौघांस आपल्या प्रपंचाचा पुरवठा आपल्यालाच कूरून घेण्याच्या असल्यामुळे सर्व जिन्नस पाहून, निरखून, निर्मळ असे ठेवावे लागतात. आपला संसार आपण हांकू लागण्यास समर्थ झालेल्या लोकांची आत्मवंचनेा होत नाही. * जो दुस-यावरी विश्वासला तो स्वयें ठार बुडाला, 'असा जगांतला नियमच आहे. (८) सहकारितेनें काढलेल्या कोठ्यामुळे मालाची स्वस्ताई होते. त्यामुळे गोरगरिबांना प्रपंच हुलका होतो. असें पहा। कीं, इंदापुरास जोंधळा उत्पन्न होतो. पण शेतक-यांजवळ त्राण नसल्यामुळे तो पुण्यासारख्या जवळपासच्या बाजारास नेऊन विकीत नाहीं. मुंबईचा एखादा व्यापारी इंदापुरापर्यंत येऊन सटद्यानें सर्व धान्य खरेदी करून घेऊन जातो. ह्मणजे पहा, इंदापुरापासून मुंबई पर्यंतचें रेलवेचें भाडें त्या जोंधळ्यावूर बसून पुन्हा ते पुण्यास अशणावयाचे ह्मणजे त्यावर मुंबई ते पुणें रेलवे भाड्याची आकारणी होते. यांत रेलवेंतील चो-यांची, अडत्यांच्या हमालीची व लुचेगिरीची, अडत्यांच्या जागेच्या भाड्याची सारखी भर पडत जाते. त्यानंतर दाणेआळींतील किरकोळ व्यापायांच्या दुकानाच्या भाड्यातोड्याची, त्यांच्या नफ्याची, त्यांच्या भांडवलाच्या व्याजाची, अशी सारखी भर पडतेच. पुन्हां पेठांपेठांतले वाणी-उदमा हा जोंधळा आपल्या दुकानांत नेऊन सांठवतातच. इतक्या सगळ्यांची तुंबडी गोरगरिबांस भरावी लागते. यामुळे दुष्काळांत तेरावा मुहिना होऊन महागाई जड जाते. सहकारी कोठ्यामुळे ही