पान:ओळख (Olakh).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेच वावरत असते. मढेकरांनी रसव्यवस्थेवर काही मूलभूत आक्षेपही घेतलेले आहेत. तर्कतीर्थांना रसव्यवस्थेतील मढेकरांचे आक्षेपही मान्य नाहीत आणि मराठी टीकाशास्त्र रसयव्यवस्थेच्या आश्रयाने वावरते हेही मान्य नाही. म. करांच्या विवेचनांचा उत्तरपक्ष करण्यास शास्त्रीबुवा प्रयुक्त झालेले आहेत आणि हा उत्तरपक्ष अतिशय रेखीवपणे व नीटसपणे त्यांनी मांडलेला आहे. एकप्रकारे हा ज्ञानक्षेत्रातील एका आचार्याने दुसऱ्या आचार्याची वैचारिक पूजा बांधण्याचाच प्रकार आहे. आपल्या पहिल्या व्याख्यानात तर्कतीर्थांनी मराठी वाङमयसमीक्षेच्या उदयाचा विचार केला आहे. हा विचार करताना आधुनिक मराठी साहित्यसमीक्षेचे पहिले डौलदार रूप विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या रूपाने प्रकट झाले असा चिपळूणकरांचा यथार्थ गौरव केलेला आहे. कृष्णशास्त्री आणि विष्णुशास्त्री चिपळणकर, न्या. रानडे, वि. प. रानडे इत्यादी समीक्षकांच्या साहित्य समीक्षेची रेखीवपणे ओळख करून देऊन तर्कतीर्थ म्हणतात, मराठी साहित्य समीक्षेची आरंभावस्था रसव्यवस्थेला प्रमाण गहीत धरून निर्माण होत नाही, तर ती पाश्चिमात्त्य साहित्यसमीक्षेच्या निकषांना अनुसरून जाते. साहित्यावर, ते ज्या समाजात निर्माण होते, त्याचा परिणाम होतो. ललित साहित्यात देशकाल परिस्थितीचे प्रतिविव असते हे तर विष्णुशास्त्री दाखवून देतातच पण गरजेनुसार पाश्चिमात्त्य पद्धतीने संविधानक, स्वभावरेखन यांचाही विचार करतात. दुसन्या व्याख्यानात तर्कतीर्थांनी हाच मुद्दा पुढच्या काळाच्या संदर्भात तपासून घेतला आहे. आगरकर, वा. व. पटवर्धन, कोल्हटकर, साहित्यसम्राट केळकर आणि इतर टीकाकार यांचा आढावा घेत मराठी साहित्य समीक्षा आपल्या विकसित अवस्थेतही वेगवेगळ्या पाश्चिमात्त्य साहित्य निकषांना अनुसरत राहिली हे तर्कतीर्थांनी दाखवून दिले आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी मराठी साहित्यसमीक्षेत जो सर्वात मोठा वाद झाला तो कलाविरोधी जीवन या स्वरूपाचा होता. एक पक्ष मोठ्या आग्रहाने कला ही कलेसाठी आहे असे सांगत होता. तितक्याच आग्रहाने दुसरा पक्ष जीवनाच्या उपासनेची आवश्यकता प्रतिपादन करीत होता. या गाजलेल्या वादाकडे तर्कतीर्थांनी लक्ष वळवलेले नाही. कारण हा वादसुद्धा रसव्यवस्था प्रायः बाजूला ठेवूनच लढविण्यात आलेला होता. तर्कतीर्थांच्या बाजूने सांगता येण्याजोगे हे अजन एक महत्त्वाचे प्रमाण आहे.

 मढेकरांच्या आक्षेपांचा निरास या पद्धतीने करता येईल काय, हा प्रश्न मात्र विवाद्य मानला पाहिजे. आधुनिक मराठी साहित्यात विशेषतः एखाद्या कवीविषयी लिहिताना त्याचे सगळे काव्य डोळ्यांसमोर ठेवनच. वरी-वाईट मते देणे भाग असते. अशा रीतीने एकेका लेखकाचा त्याच्या एकूण साहि

६६

ओळख