पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅईल इंजिनची माहिती. ( ፪% ) जर कांहीं कारणामुळे लाइनरच्या जाईटमधून सिलिंडरमध्यें पाणी यावयास लागलें आणि जरी हें पाणी अगदीं थोडें येत असलें तरीसुद्धां इंजिन चालू होणार नाहीं. ह्मणून लाइनर काढून दुसरा जाइंट घातला पाहिजे. जाइंट घातल्यानंतर इंजिन चालू करावें व इंजिनवरून लागलेंच काहीं काम घ्यावें. ह्मणजे ‘ व्हेपोराइझर वगैरे सर्व भाग तापतील. काहीं वेळ गेल्यानंतर इंजिन थांबवानें व लाइनरचे व जाईटचे बोलट इंजिन निवाल्यावर पुंन्हां घट्ट करावें. असें न केल्यास पुन्हां लाइनर गळू लागण्याची भिती असत. जर बंपिंग असेल तर एक्सप्लोजन अगोदर होती असें समजावें. याचें कारण व्हपोराइझर फार तापला असेल किंवा तेल जास्त होत असेल नाहींतर हवा कमी होत असेल. इंजन जरी र्थड झालें तरीही बंपिंग होतें याचें कारण अगोदर मिसफायर झाला तर दुस-या वेळेस बंपिंग होतें. दोन्ही बंपिंगच्या आवाजामध्यें फरक असतो व तो सरावानें समजावयास लागतो. गरम झाल्यामुळे बंपिंग होत असेल तर पाणी सिलिंडरमध्यें सोडण्याची व्यवस्था असल्यास सिलिंडरमध्यें सोडावें व सिलिंडरभोंवतों अगदीं खुलें जाऊ द्यावें. थड झाल्यामुलें बंपिंग होत असेल तर हवा कमी करावी व पाणी कमी सोडावें. जरूर असल्यास व्हेपोराइझर · दिवा पेटवून तापवावा. इझिशनच्या वेळेस आवाज मोठा होत असेल तर तेल जास्त जातें असें समजावें. या वेळेस एक्झास्टही काळा दिसतो. नाकिंगचा आवाज झाल्यास बेअरिंग सैल झालें असेल नाहींतर पिस्टनमध्यें गजन पिनवें बेअरिंग सैल झालें असेल किंवा फ्लायव्हीलची की सैल झाली . असेल. जरकी सैल झाली असेल तर हातोड्यानें ठोकून घट्ट बसवावी. बेअरिंगमधले ब्राम सैल झाले असतील तर घांसून पुन्हां बसवावे. पिस्टनमधले ब्रास सैल झाले असल्यास तेही पुन्हां घांसून बसवावे.