या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
ऑईल इंजिनची माहिती. ( २९) जर काँक्रीटनें किंवा विटांनी पाया भरणें शक्य नसेल तर लांकडाच्या भक्कम फ्रेमीवरही इंजिनें चांगल्या त-हेनें बसवितां येतील. यासाठी जमिनींत जाड लांकडी , बीमें लभीं बसवावीं आणि त्यावर फ्रेम क्लोचस्कूनी बसवावी हृाणजे हालणार नाहीं. जर इंजिन एखाद्या मजल्यावर बसवावयाचें असेल तर फ्रेम लोखंडी किंवा जाउ लांकडी बहालांवर बसवावी. भिंतीच्या पायाशीं इंजिनचा पाया केव्हांही जोडूं नये. कारण तसें केल्यास भिंत हादरून तिला नुकसान पोंचण्याचा फार संभव असते. -