पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्ष - १९९४ संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) पुढील वर्षी (१९९५) आपल्या स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येचे वर्ष म्हणून १९९४ या वर्षास असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तसं पाहिलं तर संयुक्त राष्ट्रसंघ प्रतिवर्षी एखाद्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व त्या अनुषंगिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी म्हणून प्रत्येक वर्ष एका उपेक्षित सामाजिक प्रश्नास समर्पित करत असते. तसे १९९४ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्ष म्हणून जाहीर केले आहे. वरकरणी पाहिले तर या विषयाकडे आकर्षण्यासारखे काही नाही. ना विषय म्हणून, ना प्रश्न म्हणून आणि म्हणूनच कदाचित कुठल्याही आंतरराष्ट्रीय वर्षाची जेवढी उपेक्षा झाली नसेल तेवढी या वर्षाची झाली ही वस्तुस्थिती आहे. ना शासकीय पातळीवर ना स्वयंसेवी संस्थांच्या स्तरावर या असाधारण महत्त्वाच्या सामाजिक घटकासाठी, कुटुंबासाठी समर्पित केलेल्या वर्षाची दखल घेतली गेली. कुटुंब हा स्तर तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा, जाणिवेचा घटक. घर, कुटुंबाची ओढ नसलेला मनुष्य विरळा. असे असून या वर्षाकडे दुर्लक्ष कसे? । संयुक्त राष्ट्रसंघ जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय सामाजिक महत्त्व असलेल्या विषयास एखादे वर्ष समर्पित करतो तेव्हा तो त्या वर्षाचे एक घोषवाक्य अथवा घटक विषयही जाहीर करतो. 'Family: Resources and Resposibilities in a changing world' हे या वर्षाचे संदेश सूत्र होय. बदलत्या जगाच्या संदर्भात कुटुंबाची साधने (स्रोत) व जबाबदा-यांचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपल्याची जाणीव देणारा हा विषय. एकीकडे 'वसुधैव कुटुंबकम्'च्या दिशेने घोडदौड करणारे जग, तर दुसरीकडे दिन प्रतिदिन दुभंगणारी कुटुंबे. ‘नटसम्राट' च्या नायकाचा ‘कुणी घर देता का घर ?' चा टाहोच जणू या विषयाने व्यक्त केला आहे. प्रत्येकाला हवं असतं एक लहान घर, पंख मिटून वंचित विकास जग आणि आपण/६६