पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अपमान असत नाही तर ती अवहेलना असते, हे लक्षात घेतले पाहिजे. समाज विकासाचा आजवरचा प्रवास अभिजन वर्गाकडून बहुजन वर्गाकडे आला खरा पण तो जर ‘सर्वजन' केंद्रित होईल तर तो मानवलक्ष्यी बनेल. कायदे, योजना, तरतुदीने वंचितांना समान सामाजिक न्याय मिळणार केव्हा? गरज आहे वंचितांप्रती असलेल्या सध्याच्या सामाजिक मानसिकतेत बदल होण्याची. तो व्हावा म्हणून हा संवाद लेखनप्रपंच!! वंचित विकास जग आणि आपण/४९