या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
वंशाला दिवा हवा हा पारंपारिक विचार दृढ असणा-या समाजात मुलींचे अस्तित्व टिकले पाहिजे आणि स्त्री जन्माचे स्वागत झाले पाहिजे हा विचार घेऊन आपण कृतीशील भूमिका घेणार आहोत. आपण स्त्रीत्वाचा आदर करता. आपण रुढीवादी पुरुषसत्ता समाज बदलण्यासाठी प्रयत्न कराल. आपण आपल्या कृतीशील भूमिकेतून समाज मानस बदलण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहात. आपला आदर्श इतरांना प्ररेणादायी ठरावा असाच आहे. म्हणूनच आपल्या हाती हे पुस्तक देताना आणि लेक लाडकी अभियानात आपले स्वागत करताना आम्हास आनंद होत आहे.....