पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगली जिल्हा परिवर्तन शक्य आहे. | सांगली जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढीस लागली होती. परंतू मुळातच झालेली तूट न भरुन निघणारी होती. त्यामुळेच हा जिल्हा बेटी बचाओ-बेटी पढाओ या कार्यक्रमातील वाईट १० जिल्ह्यातील दहावा जिल्हा ठरला. महाराष्ट्र, कर्नाटक सिमेवर असणा-या या जिल्ह्यातील सर्व ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सलग २ दिवस गंभीरतापूर्वक पार पाडले. जिल्ह्यातील आणि सीमेलगत सुरु असणा-या छुपे पध्दतीने चाललेल्या गर्भलिंग निदानाच्या प्रकारावर मुक्तपणे सविस्तर चर्चा झाली. बेकायदेशीर गर्भपाताची संख्या वाढली असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करणा-या कर्मचा-यांनी नोंदविली. प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. दिपेंद्र कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतिश लोखंडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चे समन्वयक पूर्णवेळ हजर होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्भपाताची औषधे पतीच्या सहकार्याने वापरुन बेकायदेशीर, तज्ञता नसताना १५० बेकायदेशीर गर्भपात करणारी महिला डॉक्टर तपासणी दरम्यान सापडली. तिच्यासह ५ डॉक्टरांवर वैद्यकिय गर्भपाताच्या कायद्यानुसार पोलीस केस, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे सल्लागार समिती सक्रीय झाली. जिल्हाधिकारी व लोक प्रतिनिधी स्तरावर याची चर्चा झाली. प्रसिध्दी माध्यमांनी कारवाईची, त्यानंतरच्या कारवाईची चर्चा केली. स्वयंसेवी संस्था, संघटना सक्रिय झाल्या. त्यामुळे कायद्याच्या अंमल बजावणीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती झाली. मुलींची संख्या सर्व तालुक्यांमध्ये सातत्याने पण हळूहळू वाढताना दिसत आहे ही बाब सकारात्मक आहे. 'लेक लाडकी' ही पुस्तिका 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या कार्यकमांतर्गत कॅलेंडर स्वरुपात छापण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांनी व्यक्त केला आहे. गावागावात वातावरण लेक लाडकीसाठी पोषक बनत आहे. ही गोष्ट केवळ ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणामुळे शक्य झाली. या प्रशिक्षणापश्चात जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था, संघटना सक्रीय झाल्या, टास्क फोर्स, जिल्हा सल्लागार समिती सक्रीय झाली.