पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बुलढाणा जिल्हा ताराबाई शिंदेचा विजय असो... स्त्री मुक्तीच्या आद्यप्रणेत्या ताराबाई शिंदे आणि राजमाता जिजाऊ यांची जन्मभूमी असणारा बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यात मुलींची संख्या कमी झालेली आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. टाकसाळ, वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष श्री. रविकांत तुपकर, जिल्हापरिषद सदस्य श्री. विनोद वाघ या सर्वांनीच ही बाब गांभिर्यता पूर्वक स्वीकारली असून कालबध्द कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. • जिजाऊचे जन्मगांव असणा-या सिंदखेड राजामध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ. बनसोडे यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात यश आले ही कारवाई हा या प्रशिक्षणाचा परिणाम आहे. सिंदखेड राजा येथे विनोद वाघ यांच्या पुढाकाराने सामुहिक विवाह सोहळा पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियाना अंतर्गत विद्याथ्र्यांचा महामेळावा आयोजित केला. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांची सर्व माहिती उघडपणे सांगितली. डीकॉय ऑपरेशन करुन गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना रंगेहात पकडण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्या कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवानंद टाकसाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक अधिकारी टास्कफोर्सचा सर्वसदस्यांची तातडीने आणि विशेष बैठक आयोजित केली. प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रशिक्षणा पश्चात 'लेक माझी लाडकी' नावाने चळवळ गतीमान करण्यात यश आले आहे. लवकरच ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्यात यावे आणि जिजाऊंच्या जिल्ह्यात गर्भाशया पासून थडग्यापर्यंत आणि जीवनभर स्त्रीयांना सुरक्षितता मिळावी आणि विकासाची सर्व दालने खुली व्हावीत असा मनोदय अॅड. शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केला. प्रथितयश वकील असणा-या या बुलढाण्याच्या कन्येने स्वत: गरोदर असताना डिकॉय ऑपरेशनमध्ये भाग घेऊन, आपली साक्ष नोंदवून गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना शिक्षा होण्यासाठी पुढाकार घेतला.