________________
मूळ ग्रंथकर्त्यांची प्रस्तावना. आमच्या शाळांत ( इंग्लंदातील) पदार्थविज्ञान किंवा सृष्टिशास्त्र शिकविण्याचे जे वर्ग आहेत, त्या वर्गास उष्णता हा विषय जे शिकवितात, त्यांस हा विषय शिकविण्या- जोग्या योग्य पुस्तकाची जी उणीव वाटत होती, ती नाहींशी करावी, याच हेतूनें हैं पुस्तक लिहिलें आहे. हा हेतु कोणत्या रीतीनें तडीस नेला आहे, हे समजण्यासाठी प्रस्तुत पुस्तक लिहि- तांना ज्या विशेष गोष्टीकडे मुख्यत्वें लक्ष दिले आहे, तें खालीं सांगितलें आहे. (१) वाचकास पदार्थविज्ञान शास्त्राचे पूर्वी मुळींच ज्ञान नसून प्रथमतःच तो या पुस्तकाचें अध्ययन करीत आहे, असें समजून विवेचन केले आहे. या करितां विषयाचे विवेचन व स्पष्टीकरण प्रथमतः फार लांबलचक व अगर्दी नव्या विद्या- र्थ्यांस समजण्या जोगें असें बालबोध आलेले आहे. मात्र हळू हळू पुढे विवेचन थोड- क्यांत देण्याचा क्रम धरिला आहे. (२) याच कारणास्तव ज्या विषयांचा उष्णताशास्त्रांत वास्तविक समावेश होत नाहीं, परंतु या शास्त्राच्या अध्ययनास त्या विषयांचे स्पष्टीकरण होणें जरूर आहे अर्से दिसलें, त्या विषयांचे या पुस्तकांत विवेचन केलें आहे. याच उदाहरणें कलम ५० ते ५२; ६०; ६८ ते ८३; २७५ ते २७९ यांत आढळतील. (२) घन, द्रव आणि वायु यांच्या प्रसरणावरील, विशिष्ट उष्णतेवरील आणि उष्णतेच्या यांत्रिक कल्पनेवरील प्रकरणांत जो गणिताचा भाग आलेला आहे, त्याचे विवेचन फार सुलभ रीतीने केले आहे. प्रत्येक ठिकाणी पूर्णपणे स्पष्टीकरण केलेले असून उदाहरणें ही सोडवून दाखविली आहेत. (४) प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रकरणांतील विषयावर प्रश्न दिले आहेत, आणि जेथें जरूर दिसले तेथे उदाहरणें ही दिली आहेत. (५) बुकाची रचना अशी केली आहे की, खाली नमूद केलेली कलमें गाळून अगदी खालच्या वर्गातील मुलांस हा विषय शिकवितां यावा आणि ही कलमें सुद्धां सर्व पुस्तक वरील वर्गांस शिकवितां यावें. हीं कलमें गाळल्यानें कांहीं तुटकपणा दिसूं मये असे धोरण धरले आहे. क. ३२ ते ४३|४७ ते ४९।५५ ते ५८|६५१६७१८२/८३ | १०२ ते १०५/१४५ ते १५३|१७३|१८५ । १९८।२०३ ते २१९/२२८ । २२९/२३१/२३२/२३३| २४२/२४३/२४६।२५३ ते २५५/२७२/२७४ ते २९३.