पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विज्ञप्ति

 माझें हैं नवें प्रकाशन वाचकांच्या हाती देण्याचा योग येत आहे याबद्दल प्रथम त्या दयाघन परमेश्वराचे मनःपूर्वक आभार मानतो.
 'इस्लाम आणि संस्कृति ' हे पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याला प्रकाशांत आणण्याकरितां माझ्या जिवलग स्नेह्यांनी जी आस्था दाखविली त्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे. पुस्तक प्रकाशित करण्याकरितां ज्या हिंदु-मुस्लिम बांधवांनी अत्यंत दिलदारपणानें प्रोत्साहन दिले. त्याचा मी अत्यत आभारी आहे.
 'मुस्लिम मराठी साहित्य' या नावाखाली मी आतांपर्यंत पुस्तकें प्रकाशित केली. मुस्लिम मराठी साहित्यापेक्षा 'महाराष्ट्र मुस्लिम साहित्य' हे नांव अधिक सुटसुटीत व सार्थ आहे असे वाचकांनी सुचविल्यामुळे यापुढे 'महाराष्ट्र मुस्लिम साहित्य' या नावाखाली पुस्तकें प्रकाशित केली जातील,
 माझ्या महाराष्ट्रीय बंधु-भगिनींनी माझ्यावर कृपादृष्टि ठेवून, माझ्या हातून होत असलेली मराठी साहित्याची ओबडधोबड सेवा गोड करून ध्यावी हीच विज्ञप्ति.

सर्वांचा नम्र

सय्यद अमीन