Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


"या तुमच्या धर्मात येण्यासाठी मी काय करूं ?" त्याने विचारले.
 "हातपाय धुवून या. शुचिर्भूत व्हा. आणि म्हणा की एका ईश्वराशिवाय दुसरा ईश्वर नाही. मुहंमद ईश्वराचे पैगंबर आहेत. ही शपथ वेतलीत की नवधर्मी, इस्लामी तुम्ही झालेत."
 त्यानें तसें तात्काळ केलें. नंतर तो म्हणाला, "तुम्ही सादचेंहि मन वळवा म्हणजे चांगले होईल."
 पुढे सादहि कुराण ऐकून इस्लामी झाला. कुराणाची विलक्षण मोहनी पडे. भाषेचं व विचारांचें, त्यांतील सामर्थ्याच्या प्रत्ययाचे अपूर्व आकर्षण ऐकणाराला वाटे.
 साद नंतर आपल्या जमातींत गेला व म्हणाला, "अबुल अशालाच्या संतानांनो, तुमचे माझे काय बरें नातें?"
 "तुम्ही आमचे नेते, सर्वांत शहाणे पुढारी. आमच्यांतील सर्वश्रेष्ठ, सुप्रसिद्ध असे तुम्ही." लोक म्हणाले.
 "तर मग मी शपथपूर्वक सांगतों की जोपर्यंत तुम्ही एक ईश्वर मानणार नाहीं, त्याच्या पैगंबरांस मानणार नाहीं, तोपर्यंत माझ्या जिवाला चैन पडणार नाहीं."
 "आम्ही सारे तसें करतो." लोक म्हणाले. आणि ते सारे इस्लामी झाले.
 खजरज सारे इस्लामी झाले. बनु औस जमात राहिली होती. त्यांचा नेता कवि अबु कयास हा होता. त्याला इब्नुल अस्लात असेंहि म्हणत. तो अद्याप विरोधी होता.
 आणि पुन्हां मक्केला, यात्रेला जाण्याची वेळ आली. मुहंमदांस यसरिबला बोलवायचं की नाही? अरब म्हणाले, "पैगंबर असोत वा नसोत, मुहंमद आमचा नातलग आहे. त्याची आई यसरिबची आहे. तो आमचा आहे. ज्यूंना निष्प्रभ करायला तो उपयोगी पडेल. आणि तो देवाचा पैगंबर असेल तर फारच छान. सोन्याहून पिवळे. हे ज्यू नेहमीं 'मेशिया येणार' मेशिया येणार, म्हणत असतात. तो आमच्यांत आला असें आम्ही अभिमानाने सांगू, मुहंमदांची शिकवण ज्यूसारखीच दिसते. एकेश्वरवादच आहे. म्हणून या नव धर्माचा व ज्यूधर्माचा समन्वयहि करतां येईल. भांडणे जातील. सारे सुखानें राहूं. एकेश्वरी मत आम्हांला अपरिचित नाहीं. येऊं दे

इस्लामी संस्कृति । ८३