बाराशिवाय जास्त वजनदार लोक मुहंमदाकडे नव्हते ! मोठी कठीण वेळ होती. सर्व जगाला जवळ घेऊं पाहणारे मुहंमद बहिष्कृत होते. जो जगाला जवळ घेऊं पाहतो त्याला जग प्रथम दूर लोटतं, असाच या वक्रतुंड जगाचा इतिहास आहे!
कुरेशांनाहि मनांत आतां लाज व शरम वाटूं लागली. कांहीं तरी पुन्हां तडजोड व्हावी वाटत होतें. एके दिवशीं वृद्ध अबु तालिब काबाच्या मंदिरांत गेले होते. तो तेथें लावलेला करार उधईनें खाऊन टाकला होता! अबु तालिबांनी तें पाहिलें, ते कुरेशांना म्हणाले, "तुमचा बहिष्कार देवालाहि आवडत नाहीं. तो पहा उधईनें खाल्लेला करार. किती निर्दय आहांत तुम्ही!" आणि कुरेशांच्या घराण्यांतील पांच प्रमुख लोक अबु तालिबांकडे गेले व म्हणाले, "चला आमच्या बरोबर. या कोंडलेल्या जागेतून बाहेर पडा. बहिष्कार संपला. इ. स. ६१९ मध्यें मिशनच्या दहाव्या वर्षी ही तडजोड झाली. हाशिम व मुत्तलिब घराणी पुन्हां घेण्यांत आली. सारे मक्कावाले एकत्र राहूं लागले.
हीं जीं बहिष्काराची तीन वर्षे, त्या वर्षात फक्त यात्रेच्या वेळेस मुहंमद प्रचार करीत. यात्रेकरूंत कोणी श्रोता मिळतो का पहात. परंतु खुनशी अबु लहब पाठोपाठ असेच. तो ओरडून म्हणे, "याचे ऐकू नका. हा सैतान आहे. झूट आहे."
मुहंमद म्हणत, "देवा, अहोरात्र मी माझ्या लोकांना सांगत आहे. टाहो फोडीत आहें. परंतु ते माझ्यापासून अधिकच दूर त्यामुळे जात आहेत. मी तुझा संदेश त्यांना सांगूं लागलों की ते कानांत बोटे घालतात. परंपरागत चुका चालू ठेवतात. अधर्म व अनाचार सुरू ठेवतात. ते तुझ्या धर्माला तुच्छ मानतात. प्रभो, नवधर्म घ्या म्हणून रात्रंदिवस त्यांना सांगतों; आणि त्यांना क्षमा कर म्हणून तुलाहि सदैव सांगतो."
आणि मुहंमदांवर याच वेळेस अति महान् प्रहार झाला. दैवाचा दुष्ट घाव. अबु तालिब व खदिजा दोघे थोड्या अंतरानं मरण पावलीं! मुहंमदांना सोडून गेलीं, परलोकीं गेली. आतांपर्यंत मुहंमद व त्यांचे शत्रु यांच्यामध्ये वृद्ध व सन्मान्य अबु तालिब हेच पहाडाप्रमाणें खडे होते. त्यांनीच या पोरक्या मुलाला पाळलें, पोसलें, प्रेम दिलें. त्यांनी त्याला कधीं सोडलें नाहीं. आणि खदिजेचें
७८ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/९२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे