अनुयायांचे छळक म्हणून प्रसिध्द आहेत. स्वतः उमरहि मुहंमदांचे प्रथम कडे विरोधक होते.
त्याची बहीणहि मुहंमदांच्या धर्माची झाली होती. एके दिवशीं उमर हातांत नंगी समशेर घेऊन मुहंमदास ठार मारण्यासाठीं जात होता.
"कोठें जातोस उमर!" एकानें विचारलें.
"मी मुहंमदास शोधीत आहें. तो कुरेशांना मूर्ख म्हणतो. धर्माची निंदा करतो. आमच्या देवांची टिंगल करतो. ते अपकीर्तित करतो. आमच्यांत तो भांडणे लावीत आहे. भेद पाडीत आहे. त्याला ठार करतो." उमर म्हणाला.
"तुझ्या घरांतल्यांचे आधीं शासन कर. त्यांना रस्त्यावर आण. त्यांना कर ठार."
"माझ्या घरांत नवधर्मी कोण आहे!"
"तुझी बहीण फातिमा व तिचा नवरा सैद हे मुस्लीम झाले आहेत."
हे ऐकून उमर एकदम बहिणीकडे जायला निघाला.
बहिणीच्या घरीं खब्बाब कुराण शिकवीत होता.
उमर हातांतल्या नंग्या समशेरीसह एकदम घरांत घुसला व म्हणाला, "कसला आवाज मी ऐकला?"
"कांहीं नाहीं उमर."
"नाहीं कसा? कांहींतरी तुम्ही म्हणत होतात. तुम्ही मुंहमदांचे अनुयायी झाला आहांत नाहीं?" असें म्हणून सैदवर त्याने वार केला. फातिमा पतीला वांचवायला मध्यें पडली. तिलाहि लागलें. ती म्हणाली, "होय आम्ही मुस्लीम झालो. नवधर्म घेतला. एक ईश्वर व त्याचा पैगंबर यावर आमचा विश्वास आहे. तुझी इच्छा असेल तर कर आम्हाला ठार."
जखमी बहिणीच्या तोंडावरचें रक्त पाहून उमरचें हृदय द्रवले. तो एकदम मृदु झाला. तो म्हणाला, "तुम्ही जो कागद वाचीत होता तो मला द्या. मला पाहूं दे." आणि बहिणीनें शेवटीं धीर करून तो कागद भावाच्या हातीं दिला. कुराणाचा विसावा सुरा तो होता. उमरनें ती दैवी वाणी, संस्फूर्त वाणी वाचली. वाचल्यावर तो म्हणाला, "खरेंच किती सुंदर, किती उदात्त ही वाणी !"
७६ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/९०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे