या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनोगत
नवसाक्षरांनी आत्मसात केलेली साक्षरता टिकून राहावी, एवढेच नव्हे, तर नवसाक्षरांचीवाचनक्षमतावाढीस लागावी, वाचनामध्ये गती यावी, त्यामधून त्यांना नवनवीन
विषयांची माहिती व्हावी व जीवनाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी यावी, या उद्देशाने नवसाक्षरांसाठी छोटी छोटी पुस्तके विभागीय साधन केंद्रामार्फत प्रकाशित केली
जातात.
ही सर्व पुस्तके वाचकांना आवडतील अशी आशा आहे. पुस्तकांसंबंधी येणाऱ्या अभिप्रायांचे स्वागतच होईल.
पुस्तकांच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग लाभला, त्या सर्वांची ही संस्था ऋणी आहे.
औरंगाबाद
संचालक
महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था,
औरंगाबाद.
३० सप्टेंबर १९९५