पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुठलेही वेगवेगळे विचार समोर आले की अशा त-हेची असुरक्षितता निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण ही असुरक्षित स्थिती लवकरात लवकर बदलली नाही तर समाजावर विपरीत परिणाम होतो. कळत नकळत विचारात, वर्तनात याचा प्रभाव पडतो व आपल्यापेक्षा वेगळ्या (समलिंगी) असलेल्या व्यक्तींबद्दल द्वेष निर्माण होतो. ही समलिंगी व्यक्तींबद्दल असणारी भीती व त्यातून निर्माण होणारा द्वेष याला 'होमोफोबिया' म्हणतात. अशा दृष्टिकोनामुळे समलिंगी व्यक्तींवर अन्याय होतो. असा अन्याय होऊ नये म्हणून या विषयाच्या विविध विचारधारा समजून घेणं महत्त्वाचं आहे, याच्यातूनच ही असुरक्षितता कमी होईल आणि समाज सुदृढ व सहिष्णु बनेल. O O इंद्रधनु ... २६