पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ट्रान्सजेंडर स्त्री ट्रान्ससेक्शुअल

जी व्यक्ती शरीराने स्त्री आहे पण मानसिकदृष्ट्या पुरुष

आहे. (ती स्त्री स्वत:ला पुरुष समजते.)

काही ट्रान्सजेंडर पुरुष, आपलं शिश्न, वृषण शस्त्रक्रिया

करून काढून टाकतात. काही जण कृत्रिम योनी बसवतात. काही जण कृत्रिम स्तन बसवतात. शस्त्रक्रिया, संप्रेरकं, व्हॉइसथेरपी, कॉसमेटिक शस्त्रक्रिया करून स्त्री बनतात. अशा व्यक्तीला ट्रान्ससेक्शुअल म्हणतात. तसंच, काही ट्रान्सजेंडर स्त्रिया शस्त्रक्रिया, संप्रेरकं, व्हॉइसथेरपी, कॉसमेटिक शस्त्रक्रिया करून पुरुष बनतात. अशा व्यक्तीला ट्रान्ससेक्शुअल म्हणतात.

गुणसुत्र, संप्रेरकं किंवा इतर काही गांमुळे जन्माला

आलेल्या काही बाळांची जननेंद्रिय पूर्णपणे पुरुषाची किंवा स्त्रीची म्हणून विकसित झालेली नसतात. त्याच्यामुळे त्या बाळाला स्त्रीलिंगी म्हणायचं का पुरुषलिंगी म्हणायचं हे समजणं अवघड होतं. ते बाळ मोठं झाल्यावर ते स्वत:ला पुरुष समजतं का स्त्री (त्याचा लिंगभाव काय आहे) त्यावर त्याचं लिंग ठरतं. अशा व्यक्तीला इंटरसेक्स म्हणतात. इन्टरसेक्स O इंद्रधनु ... १६