पान:इंदिरा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संकेतनामक सर्ग पहिला.
दिंड्या.

आर्यभूमीच्या उत्तर प्रदेशीं
क्षत्रियांच्या कुळिं दिव्य सूर्यवंशीं
चंद्रकेतू जन्मला राजपुत्र,
तोचि कवनीं या धरिल करीं सूत्र. १
रूप सुंदर, सुकुमार तो कुमार,
शिरीं केशांचा कुरळ दाट भार,
नेत्र चंचळ बहु रम्य तेजदार,

स्वयें ज्ञानी गुणि मनाचा उदार.२ 
पिता त्याचा अति चतुर सद्विचारी;

माय साध्वी सकळिकां सौख्यकारी;

बाळ असतां तो, मातृकाळ झाला; 

अर्भकाचा प्रतिपाळ नृपें केला. ३
राजतनये माते न देखियेलें,
मातृवात्सल्या नाहिं जाणियेलें ;

तयें बाळपणीं भोगिलें वियोगा,
माय अंतरतां मुके बालभोगां. ४
पिता होता नृप स्वजनहितीं दक्ष,

प्रजापालनिं जो पुरवि पूर्ण लक्ष,
थोर न्यायें संतोषवी जनाला,
नाम सत्यध्वज शोभलें तयाला. ५