पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बिंदुमाधव खिरे . ज्या व्यक्तींमध्ये जन्मत: काही अंशी पुरुषाची व काही अंशी स्त्रीची बाह्य/आंतरिक जननेंद्रिय असतात अशा व्यक्तींना इंटरसेक्स म्हणतात. या विषयाबद्दल समाजात खूप अज्ञान आहे. अज्ञानामुळे समाजात इंटरसेक्स व्यक्तींबद्दल खूप असहिष्णुशता आहे. हे पुस्तक इंटरसेक्स व जननेंद्रियांच्या इतर काही वेगळेपणाची प्राथमिक माहिती देतं. जननेंद्रिय कशी घडतात? जननेंद्रिय घडताना वेगळेपण कसं येतं? इंटरसेक्सचे प्रकार कोणते? इंटरसेक्स व्यक्तींच्या काय समस्या आहेत ? इंटरसेक्स व्यक्तींबद्दल कायदा काय म्हणतो? या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरं या पुस्तकात दिली आहेत. या पुस्तकाच्या शेवटच्या भागात इंटरसेक्स/जननेंद्रियांत वेगळेपण असलेल्या काही व्यक्तींच्या कथा दिल्या आहेत, ज्याच्यातून त्यांचं भावविश्व प्रकट होतं. . . FIR समपथिक ट्रस्ट, पुणे